मालेगांव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
जिल्हाधिकारी एस बुवनेश्वरी यांच्या आदेशानुसार निवासी उप-जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांचे मार्गदर्शनात वाशिम जिल्ह्य़ातील जिल्हास्तर तालुकास्तरावर मालेगाव येथे आपत्ती व्यवस्थापन एक दिवसीय प्रशिक्षण सम्पन्न झाले.
मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन पुर्व तयारी आणी त्यावर उपाययोजनांबाबत करावयाच्या कार्यवाही तसेचपूर, विज, आग, भूकंप, भूसख्खलन, रस्ते अपघात,सर्पदंश, उष्मलाट या विषयांवर एक दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम १७ मार्च 2025 रोजी मालेगाव तहसील कार्यालयात आयोजन करण्यात आले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुंड तहसीलदार मालेगाव हे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शाहु भगत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वाशिम, आणि मार्गदर्शक दिपक सदाफळे [जिव-रक्षक],पिंजर जिल्हा अकोला,निवासी नायब तहसीलदार रंजना गोरे,नायब तहसीलदार अरविंद करंगळे,सुनिल देशमुख,नायब तहसीलदार, पु.नि.वांजोळ, पो.उ.नि.संतोष इंगळे, डाॅ.अश्विनी खासबागे तालुका आरू अधिकारी मालेगाव,बिडीओ विनोद खेडकर, ता.कृषि.अ. कैलास देवकर,सास चे शाम सवई,राजा गोरे सर्पमित्र कारंजा,पवन मिश्रा जलसंधारण आणि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार दिपक पुंडे याचे हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद घुगे साहेव ग्रा.म.अ. यांनी केले तर जि.आ.व्य. अ.शाहु भगत यांनी आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले नंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रशिक्षक दिपक सदाफळे [जिव-रक्षक] प्रमुख मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक पिंजर जि.अकोला यांनी पुर,आग, प्रथमोपचार,रस्ते आणि इतर अपघात, विज,भूसख्खलन या विषयावर शोध व बचाव कार्याचे प्रशिक्षण देऊन योग्य मार्गदर्शन केले यासह शोध व बचाव साहित्यांची ओळख आणि त्यास हाताळण्याची पद्धतीचे प्रात्यक्षिकेचे सादरीकरण करुन दाखविले यानंतर राजा गोरे सर्पमित्र कारंजा यांनी सर्पदंश या विषयांवर योग्य मार्गदर्शन केले.पर्यावरण जलसंधारण या विषयावर पवन मिश्रा यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मार्गदर्शन तहसीलदार पुंडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून उपस्थितांना मान्सूनपूर्व काळात आपत्ती व्यवस्थापनाची योग्य अंमलबजावणी करावी यावर योग्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन घुले यांनी केले सदर प्रशिक्षण कार्यक्रमाला तालुका स्तरावरील विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी सरपंच,मंडळ अधिकारी,ग्रामसेवक,तलाठी, कृषि सहाय्यक,पोलिस कर्मचारी,मुख्याध्यापक, आरोग्य सेवक/सेविका, अंगनवाडी सेविका,आशा वर्कर,कोतवाल,रोजगार सेवक,उमेद अभियान व्यवस्थापक,रोजगार हमी योजनेच्या विभागातील कर्मचारी व इतर विभातील कर्मचारी यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मालेगाव तहसील कार्यालयातील नि.ना.त.रंजना गोरे,ग्रा.अ.घुगे अधिकारी व कर्मचारी तसेच मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या सर्च ॲण्ड रेस्क्यु टीम चे शेखर केवट, अश्विन केवट,यांनी अथक परिश्रम घेतले.अशी माहीती नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे गणेश खुळे यांनी परिश्रम घेतले





Social Plugin