Ticker

6/recent/ticker-posts

देगलूर-रामपूर-होट्टल-येरगी-चेंडेगाव-माळेगाव-बिदर आणि देगलूर ते हनेगाव हे राष्ट्रीय महामार्ग क्र 63 ला जोडण्याची मागणी



देगलूर :

 नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये आजही चांगल्या रस्त्यांअभावी हा परिसर विकासापासून कोसो दूर आहे. देगलूर तालुका प्राचीन मंदिरासाठी प्रसिध्द आहे.

 देगलूर तालुक्यातील होट्टल,रामपूर, येरगी आणि करडखेड येथे चालुक्य काळातील ऐतिहासिक वारसा असलेली मंदिरे आहेत, ती पर्यटन क्षेत्रे आहेत. त्यामुळे देश-विदेशातून लोक येथे येत असतात. मात्र येथे जाण्यासाठी चांगले रस्ते नसल्याने पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

देशातील सर्व पर्यटन स्थळे राष्ट्रीय महामार्ग शी जोडले जात आहेत.त्या धर्तीवर राष्ट्रीय महामार्ग क्र.63 हा रामपूर - होट्टल - येरगी - चेंडेगाव (तेलंगणा)- माळेगाव - बिदर मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 शी जोडावा त्यामुळे नांदेड ते बीदर रस्ता सुद्धा कमी अंतराचा होतो.तसेच देगलूर ते हनेगाव रस्ता सुद्धा राष्ट्रीय महामार्ग शी जोडावा ज्यामुळे शीख भाविकांना सुद्धा बीदर जाण्यासाठी सोयीचे व कमी अंतराचे होईल .

 नांदेडहून येणारे शीख भाविक दररोज बिदर येथील गुरुनानक गुरुद्वारात जातात.परंतु हा रस्ता खूपच खराब झाल्याने शीख भाविकांना तसेच या मार्गावरून जाणाऱ्या शेकडो विद्यार्थी व नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. हा मार्ग चांगला झाल्यास विविध प्रांतातून येणाऱ्या सिख व इतर भाविकांना रामपूर,होट्टल,येरगी व करडखेड येथील चालुक्य कालीन मंदिरांना भेट देता येईल आणि त्यामुळे या क्षेत्रातील पर्यटन वाढण्यास मदत होईल आणि आपली ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी वाव मिळेल.हे चार ही मंदिरांचे पर्यटन सर्किट झाल्याने एक महत्वाचे पर्यटन सर्किट म्हणून प्रसिद्धीस येईल.

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना दिलेल्या निवेदनात म्हटले की हा राष्ट्रीय मार्ग जोडूनदेगलूरच्या जनतेला खराब रस्त्यापासून दिलासा द्यावा. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा येरगी चे सरपंच संतोष पाटील यांनी काल सोमवारी दिनांक 10 मार्च रोजी दिल्ली येथे सदरील निवेदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना त्यांच्या निवासस्थानी भेटून दिले आणि याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची आग्रही भूमिका घेतली आणि सविस्तर चर्चा केली.

यावेळी संतोष पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा येरगी येथील चालुक्य कालीन सांस्कृतिक वारसा दर्शवणारा कॉफी टेबल बुक देऊन सत्कार केला .