पाटण(दिनकर वाईकर)
फुलांनी सजवलेला आकर्षक रथ, खांद्यावर पालखी घेऊन निघालेले मानकरी त्यातच आई श्रीजानाईचा उदो उदो, सदानंदाचा येळकोट गजर करीत तीर्थक्षेत्र जेजुरी तील ग्रामस्थांचा जनसमुदाय दि. २ मार्च रविवारी आपल्या श्रीजानाईदेवी पायी पदयात्रा सोहळ्याने तिर्थक्षेत्र निवकणे ता. पाटण कडे मार्गस्थ झाला. दि. ७ मार्च पासून शुक्रवार, शनिवार आणि रविवार असा तीन दिवस तिर्थक्षेत्र. निवकणे श्रीजानाई देवीची यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी होत आहे हा पायी पदयात्रा सोहळा जेजुरी गावाच्या सीमेलगत दौडझ खिंडीत रविवार दि, दोन मार्चला मार्गस्थ करण्यात आला आहे रुबाबदार बैल जोडी रथाला पारंपारिक लोकवाद्य साथीला तर भक्तांचा लोक गजर ग्रामस्थांनी आणि पायी यात्रा करणाऱ्या भाविकांनी सर्व परिसर गजबजून गेला होत गुलाल भंडार्याची उधळण करत बैलगाड्यांचा ताफा पाटण तालुक्यातील निवकणे येथील श्री जानाई देवीच्या यात्रेला पारंपारिक संत नागूमाळी यांनी शेकडो वर्षापासून सुरू केलेली हा पायी पालखी सोहळा त्यांचे वंशज नागनाथ झगडे आणि त्यांचा परिवार आजही चालवत आहे श्री जानाई देवी पदयात्रा मंडळाच्या वतीने गेली क्रि त्येक वर्ष हजारो पायी जाणाऱ्या भाविकांना आणि समस्त ग्रामस्थांना आजही मोफत अन्नदान जलपान व्यवस्था अखंड ठेवत आहेत
जेजुरी येथील अनेक उद्योजक कारखानदार व्यापारी व्यापारी तसेच मानकरी गावकरी बारा बलुतेदार संघ अध्यक्ष सचिन खोमणे आपला सेवाभावी हातभार लावत आहेत यामुळे सर्व 18 पगड जाती धर्मातील ग्रामस्थ। मोठ्या भक्ती भावाने सामील होताना दिसत आहेत श्री जानाई देवीला वसुंधरा मानून या पायी मार्गावरून जाणाऱ्या पाटण खोऱ्याच्या का ऊ दरा सडा वाघापूर येथे शुक्रवार सकाळी साडे आठ वाजता निसर्ग पूजेचा कार्यक्रम झाल्यानंतर पदयात्रा पालखी सोहळा तीर्थक्षेत्र निवकणे ता पाटण कडे मार्गस्थ होणार आहे





Social Plugin