Ticker

6/recent/ticker-posts

अंबड तालुक्यातील 111 ग्रामपंचायतच्या आरक्षणाचे सोडत



अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ


       माननीय जिल्हाधिकारी यांचे आदेश दिनांक 9 एप्रिल 2025 यानुसार एकूण 111  ग्रामपंचायत च्या आरक्षणाच्या अनुषंगाने जाहीर प्रकटन दिनांक 14एप्रिल2025 रोजी लावण्यात आले होते..

      त्या अन्वये आज दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय अंबड येथील सभागृहामध्ये तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी विजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय पुलकित सिंग सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आरक्षण सोडत पूर्ण करण्यात आली.यावेळी तालुक्यातील शंभर ते दिडशे नागरिक उपस्थित होते...

      अंबड तालुक्यातील 111 ग्रामपंचायत पैकी अनुसूचित जाती याकरीता 14 ग्रामपंचायत आल्या सदर वेळी 1995 ते आज पर्यंतचा आरक्षणाचा डाटा घेऊन उतरत्या क्रमाने टक्केवारीच्या उतरत्या प्रमाणे लावून घेण्यात आले.त्यानुसार 14 ग्रामपंचायत या अनुसूचित जाती या प्रवर्गाकरिता राखीव ठेवण्यात आल्या.त्यापैकी सात ग्रामपंचायती ह्या महिला संवर्गाकरिता राखीव ठेवण्यात आल्या,त्यापैकी तीन ग्रामपंचायती नजीकच्या काळात महिला घेण्यात आल्या उर्वरित चार ग्रामपंचायत चिठ्ठ्याद्वारे आरक्षित करण्यात आल्या..

     त्यानंतर अंबड तालुक्याकरता अनुसूचित जमाती यासवर्गाकरीता एकूण तीन जागा उपलब्ध होत्या...  लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमाप्रमाणे तीन ग्रामपंचायतीचे आरक्षण करण्यात आले व त्यापैकी दोन महिलांसाठी राखीव असल्याने एक चिठ्ठीद्वारे व एक मागील नजीकच्या काळातील आरक्षण पाहून आरक्षित करण्यात आले

          त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग याकरीता अंबड तालुक्यासाठी एकूण 30 ग्रामपंचायती राखीव करण्यात आल्या आज रोजी पर्यंत एकदा नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता राखीव ठेवण्यात आलेल्या एकूण 42 ग्रामपंचायती होती त्या 42 पैकी एक एसटी व दोन एस सी समोर करीता गेलेले असल्याने त्या वगळण्यात आल्या उर्वरित 39 ग्रामपंचायती पैकी 30 ग्रामपंचायती चिठ्ठ्याद्वारे नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता राखीव ठेवण्यात आल्या. त्यापैकी 15 नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी चिठ्ठ्याद्वारे राखीव ठेवण्यात आले..

      त्यानंतर उर्वरित 64 ग्रामपंचायती ह्या सर्वसाधारण करिता उपलब्ध झाल्या त्यापैकी 32 या सर्वसाधारण महिला करता राखी काढण्यात आल्या त्यापैकी एक महिला राखीव हे चिठ्ठी द्वारे करण्यात आल्या व इतर 31 ह्या नजीकच्या काळात असलेल्या आरक्षणाचा विचार करून महिला या करता राखीव ठेवण्यात आल्या..उर्वरित 32 ग्रामपंचायती ह्या सर्वसाधारण करीता उपलब्ध झाल्या.

    यावेळी सर्व उपस्थित यांना तहसीलदार विजय चव्हाण यांनी सदर आरक्षण सोडत प्रक्रिया व कायदेशीर बाबी सर्वप्रथम समजावून सांगितले होते..आरक्षण सोडत दरम्यान अथवा त्यानंतर एकही लेखी अथवा तोंडी आक्षेप या कार्यास प्राप्त झालेला नाही.सदर वेळी नायब तहसीलदार महेंद्र गिरगे भागवत देशमुख व इतर कर्मचारी व तालुक्यातील नागरीक पत्रकार उपस्थित होते.अंबड तालुक्यातील आरक्षण सोडत ही प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या व शांततेत आरक्षण सोडत पार पडली ...