सिंदखेडराजा :- ज्ञानेश्वर तिकटे
सिंदखेड राजा :- तालुक्यामध्ये काही दिवसापासून अवैध रेती वाहतूक जोमाने सुरू होती याला आळा घालण्यासाठी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या आदेशानुसार व प्रभारी तहसीलदार प्रवीण वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीला प्रतिबंधक कारवाई करता नेमलेल्या पथकाने 18.4.2025. च्या रात्री एक टिप्पर व एक ट्रॅक्टर वर कारवाई केली. मौजे दुसरबीड येथे रात्रीला गस्त घालत असताना रात्री साडेआठ वाजता एक लाल रंगाचे महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर 575 DI एक ब्रास रेतीसह आढळून आले. सदर ट्रॅक्टर चालकास परवाना विचारला असता त्यांच्याकडे कोणताही परवाना आढळून आला नाही.
त्यामुळे सदर वाहनाचा पंचनामा करून किनगाव राजा पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे. तसेच सदर पथक फिरत असताना त्यांना पहाटेच्यावेळी शेंदुर्जन सायाळा रस्त्यावर एक टिप्पर आढळून आले. सदर टिप्पर चालकास वाहतुकीचा परवाना विचारला असता त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना आढळून आला नाही त्या मुळे या वाहनाचा पंचनामा करून साखरखेर्डा पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे. सदर कार्यवाही ही सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या आदेशानुसार प्रभारी तहसीलदार श्री. प्रवीण वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी श्री. प्रदीप मोगल,श्री.जे. आर. राठोड, श्री. श्रीकृष्ण निकम, श्री. वासुदेव जायभाये, श्री. थोरात व महसूल सेवक श्री. मदन वायाळ, व समीर पठाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.





Social Plugin