प्रतिनिधी ता.पुर्णा :- आज दि.14 एप्रिल 2025 रोजी सोमवार जिल्हा परिषद पिंपळगाव बा.शाळेत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर याची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोविंदराव बनसोडे हे होते व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन करून अभिवादन करण्यात आले
उपस्थित मान्यवर व विद्यार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले जयंती निमित्त निबंध लेखन गीत गायन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनविषयावर विविध भाषणे सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते लेखन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या व गावातील शिक्षण प्रेमी नागरिक प्रितम रणवीर यांनी सर्व विद्यार्थ्यांना जयंतीनिमित्त बक्षीस वितरण समारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी मा.जि.प सदस्य पांडुरंग बनसोडे उपसरपंच सदाशिव बनसोडे आनंद रणवीर प्रा.विठ्ठल रेनगडे सर महादेव बनसोडे राहुल रणवीर प्रकाश दुधमल व इतर गावकरी मंडळी व प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin