Ticker

6/recent/ticker-posts

वत्सगुल्म जलतारा स्पर्धा 2025 चे जिल्ह्यस्तरीय आयोजन



मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले


मालेगाव: विविध सामाजिक संस्थांच्या समन्वयाने गाव पातळीवर भूजल पुनर्भरणाची लोकचळवळ म्हणून दि:1मे 2025.ते 20मे 2025 या कालावधी वत्सगुल्म जलतारा जिल्हास्तरीय स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धाचे एकूण 100 शोष खड्डा (जलतारा) निर्मिती करणे.तथा सहभागी गावचे वहिती खालील एकूण क्षेत्र (एक्कर)जलतारा लक्षांक म्हणून गणले जाईल.

 चलतारा लक्षांक जेवढे टक्के पूर्ण केले तेवढे गुण सदर गावाला देण्यात येईल.

*जिल्हास्तरावर गावांसाठी*

प्रथम क्रमांक: १,११,१११

द्वितीय क्रमांक: ७७,७७७

तृतीय क्रमांक: ५५,५५५

असे तर

*तालुका स्तरावर गावासाठी*

प्रथम क्रमांकः ५१,५५१

द्वितीय क्रमांक: ३१,१३१

तृतीय क्रमांक: २१,१२१ असे भव्य पारितोषिक ठेवण्यातआले आहे.तसेच

विशेष सन्मान पत्र व पारितोषिक म्हणून.विजेत्या गावातील ग्राम महसूल अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी, कृषि सहाय्यक व रोजगार सेवक यांना सुद्धा विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल.विजेत्या गावामध्ये एखाद्या संस्थेने किंवा व्यक्तीने जलतारा साठी आर्थिक दान केले असल्यास सदर संस्था किंवा व्यक्तीला सुद्धा विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल.

*वॉटर हिंसे वे प्रशिक्षण*

नोंदणी केलेल्या गावातील समाजसेवेची आवड असलेल्या पाच इच्छुक व्यक्तींना (वॉटर हिरो) विनामूल्य ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक राहील. प्रशिक्षण न घेतल्यास आपल्या गावाला स्पर्धेतून बाद करण्यात येईल.

प्रशिक्षणासाठी निवडण्यात आलेल्या वॉटर हिरो ना लिहिता वाचता येणे आवश्यक तसेच त्यांच्या कडे स्मार्ट मोबाईल असणे व त्यांना तो हाताळता येणे आवश्यक आहे. ऑनलाइन प्रशिक्षण घेण्याची अंतिम दिनांक 30 एप्रिल 2025 ठेवण्यात आली आहे.


१. यामध्ये मनरेगाच्या माध्यमातून झालेले जलतारा (शोष खड्डा)तसेच

शेतक-यांनी स्वतःच्या पैश्यातून केलेले जलतारा (शोष खड्डा। ग्राह्य धरले जातील. २. स्पर्धेच्या कालावधीत व कालावधीपूर्वी केलेले जलतारा (शोष खड्डे) ग्राहा धरले जातील.३. स्पर्धा कालावधीत खोदलेला जलतारा (शोष खड्डा) व्यवस्थित असेल आणि काही कारणास्तव त्यामध्ये दगड भरू शकले नाही तर ती सुद्धा जलतारा (शोष बहा) गृहीत धरल्या जाईन.४. शोष खड्डा उत्ताराच्या दिशेला खोदून त्यामध्ये दगडा ऐवजी काडीकचरा टाकून भरला तर ती सुद्धा ग्राह्य धरल्या जाईल.५. मात्र गावातील तसेच शेतातील खताचे खड्डे यासाठी गृहीत धरले जाणार नाही.

*तपासणी व पारितोषिक पक्रियाः*

१. जलतारा नोंदवही ची साक्षांकित प्रत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यलयात २२ मे २०२३ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सादर करावी.

२. जलतारा नोंदवहीतील नोंदवहीच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल.

२. सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या गावामध्ये झालेल्या जलतारा कामाची यादृच्छिक पद्धतीने प्रत्यक्ष तपासणी होईल.

३. प्रत्यक्ष तपासणीच्या वेळी जलतारा नोंदवही नुसार प्रत्यक्ष जलतारा आढळून न आल्यास त्या गावाला स्पर्धेतून बाद करण्यात येऊन पुढील गावाला पारितोषिक देण्यात येईल.

४. दोन किंवा त्यापेक्षा जास्त गावाला समान गुण मिळाल्यास पारितोषिक विभागून दिले जाईल

 या स्पर्धेमध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 26 एप्रिल 2025 अशी ठेवण्यात आली आहे.

*नोंदणी साठी संपर्क*

वाशीम - कृतिका नागमोते तालुका कृषि अधिकारी कार्यलय वाशीम संपर्क 8390165001

मालेगाव - शुभम वाळूकर तालुका कृषि अधिकारी कार्यलय मालेगाव संपर्क 96734 54536

रिसोड- राहुल पांडे, तालुका कृषि अधिकारी कार्यलय रिसोड संपर्क 9168103869

मंगरुळपीर - अमोल हिसेकर तालुका कृषि अधिकारी कार्यलय मंगरुळपीर संपर्क 94229 20877

कारंजा - प्रेमानंद राऊत तालुका कृषि अधिकारी कार्यलय कारंजा संपर्क 92849 24080

मानोरा -प्रियांका वालकर तालुका कृषि अधिकारी कार्यलय मानोरा संपर्क 7768865052