मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मेडशी :14 एप्रिल 2025 रोजी कपिलवस्तू बौद्ध विहार मेडशी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कार्यक्रमानिमित्त नऊ वर्षीय चिमुकली तपस्या सिध्दार्थ खंडारे हिच्या भाषण कौशल्यातून फारच सुंदर शब्दात भारतीय घटनेचे शिल्पकार. महामानव.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आले.
इतक्या लहान वयात जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग तिसऱ्या मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीने बहुसंख्यिक उपस्थित लोकांपुढे व्यासपीठसमोर भाषणकौशल्य दाखवून सर्वत्र गावकऱ्यांचे मन जिंकले मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा शब्दातून तपस्या सिद्धार्थ खंडारे हिचे सगळीकडे कौतुक होत आहे





Social Plugin