Ticker

6/recent/ticker-posts

शिंदखेडा येथील भिल समाज विकास मंचतर्फै निवेदन



*शिंदखेडा भिल समाज विकास मंचचे दिपक अहिरेचे वरीष्ठ अधिकारीच्या चर्चेअंती आत्मदहनातुन प्ररावृत्त- विजय भिल यास पेट्रोल पंपावर मारहाण प्रकरण* 

शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-

शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे सोनगीर रोड वरील दलवाडे गावाजवळ पेट्रोल पंपावर दरखेडा येथील विजय भिमराव भिल यास दि. १३-३-२०२५ रोजी दुपारच्या सुमारास दहा बारा  गुंड प्रवृत्तीच्या इसमानी आदिवासी भिल समाजाच्या तरुणावर हल्ला करुन जबरदस्त मारहाण केली होती. त्या पाश्वभुमीवर सदरील आरोपीना तात्काळ अटक करून कठोर शासन व्हावे हयासाठी शिंदखेडा तहसील कार्यालयावर आदिवासी समाजाचा भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे हयांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा दि. २५  मार्चला काढला होता. सात दिवसात सदरील मारहाण करणारे आरोपीना अटक न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता त्यानुसार एक एप्रिल ला धुळे पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता सदर वरिष्ठ अधिकारीनी पदाधिकारी व पत्रकार यांच्या समक्ष चर्चा करित त्वरित कारवाई करण्याचे आदेश देण्याचे आश्वासन दिल्यावर आत्मदहनापासुन प्ररावृत्त केले.

हयावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांना निवेदन दिले. त्यात श्री. पापडकर यांनी पोलीस अधिक्षकाना तात्काळ लेखी पत्रान्वये आदेशीत करण्याचे आदेश देण्याचे आश्वासन दिले. त्यानतर अप्पर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांना निवेदन दिले. निवेदनातुन आदिवासी समाजातील गरीब तरुणावर हल्लेखोरानी जबरदस्त मारहाण केली असुन हया घटनेस अठरा दिवस उलटुनही अटकसत्र सुरु केले नाही. फक्त अट्रॉसिटी गुन्हा नोद असुन त्यावर कोणतीही कारवाई नाही हयास शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व शिरपूर पोलीस उपविभागीय अधिकारी हे कारणीभूत असुन त्यांची विभागीय चौकशी करून कारवाई करावी व गरीब आदिवासी भिल समाजाच्या तरुणास न्याय मिळवून दयावा अशी मागणी केली आहे.तसेच हायकोर्टात धाव घेण्यात येईल त्याचप्रमाणे पुढील आंदोलन तीव्र स्वरुपाचे राहील असा इशारा देण्यात आला. हयावेळी भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे, जिल्हासचिव अशोक सोनवणे, तालुकाध्यक्ष बापु ठाकरे, राजेश मालचे, श्रीराम मोरे,अशोक ठाकरे, गोपाल भिल यासह स्वतः फिर्यादी विजय भिमराव भिल उपस्थित होते.