Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस स्टेशन सिंदखेड राजा येथे आर/ओ फिल्टर व वॉटर चिलरचा शुभारंभ



सिंदखेडराजा :- ज्ञानेश्वर तिकटे

सिंदखेड राजा:- दि. 07 एप्रिल 2025 – पोलीस स्टेशन सिंदखेड राजा येथे आज अभ्यागत नागरिकांसाठी आर/ओ फिल्टर व वॉटर चिलरच्या पिण्याच्या पाण्याच्या सुविधेचा शुभारंभ उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्रीमती मनिषा कदम मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमप्रसंगी पोलीस निरीक्षक ब्रह्मदेव शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार जाधव, पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप, प्रदीप वायाळ तसेच पोलीस अंमलदार संजय डोंगरदिवे, अनिल खर्डे, संदीप डोंगरे, विठोबा आंधळे, दिपक जयभाये, श्रावण डोंगरे, ज्ञानेश्वर दहातोंडे, जाकीर पठाण, विकास राऊत, शंकर तांबेकर, गजानन बनसोडे, संदीप आघाव, मदन मुळे, महिला अंमलदार वर्षा शिंदे व शिळा कोळे तसेच सर्व गृहरक्षक व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यासाठी अथवा इतर कारणांसाठी येणाऱ्या नागरिकांना स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने ठाणेदार ब्रह्मदेव शेळके यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. या सामाजिक उपक्रमात पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांनी आपली आर्थिक भागीदारी जपत आर/ओ फिल्टर व वॉटर चिलर बसवण्याचा खर्च उचलून हे कार्य पूर्णत्वास नेले.

सार्वजनिक हितासाठी पोलीस दलाच्या वतीने उचलण्यात आलेल्या या पावलाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.