Ticker

6/recent/ticker-posts

ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ यांची कार्यकारिणी जाहीर ,



कल्याण तालुका अध्यक्षपदी मितेश जैन यांची नियुक्ती, 

कल्याण - महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ या शासनमान्य संघटनेच्या ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ यांची कार्यकारणी नुकताच ६ एप्रिल रोजी म. हो. विद्यालय ठाणे येथे संपन्न झाली. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी निजामपूर, उल्हासनगर, नवी मुंबई या महानगरपालिका तसेच सर्व तालुक्यांमधील बहुसंख्य शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या कार्यकारिणी मध्ये सर्व महानगरपालिका व तालुका मधील नवीन पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. कल्याण तालुका अध्यक्षपदी मितेश जैन यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर , मुंबई विभागीय सचिव अंकुर आहेर , ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद वाघमोडे  यांच्या हस्ते करण्यात आली.

या बैठकीमध्ये शालेय क्रीडा स्पर्धे विषयी , क्रीडा शिक्षकांच्या समस्या व क्रीडा शिक्षकांना ऑनलाईन अर्ज भरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत. महाराष्ट्रातील सर्व क्रीडा शिक्षकांच्या समस्या लक्षात घेऊन महासंघाचे राज्य अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर व इतर पदाधिकारी यांनी आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ यांना भेटून त्रुटी दूर करण्याचेकार्यकारिणी निवडताना धारुरकर यांनी सांगितले की, ठाणे जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे की, जेथे ६ महानगरपालिका व ८ तालुके आहेत. त्यामुळे ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचा विस्तार करण्यासाठी प्रत्येक महापालिकेतील व तालुक्यांमधील क्रीडा शिक्षकांना जिल्हा संघटनेत प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे.

कल्याण तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या मितेश जैन ( अध्यक्ष ) , राज तिवारी ( उपाध्यक्ष) , संजय पवार ( सचिव) ,श्री. गगन सपकाळ (सहसचिव ) , श्रीम. वृषाली मंत्रे ( कार्याध्यक्ष) , श्री. संतोष घारे ( कोषाध्यक्ष) , श्रीम. सविता घरत (महिला आघाडी प्रमुख ) , ऐश्वर्या मदने ( संघटक ) व श्री. संतोष मुंडे ( सदस्य ) पदी निवड करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघ चे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर , मुंबई विभागीय सचिव अंकुर आहेर , ठाणे जिल्हा ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद वाघमोडे ,  कोल्हापूर विभागीय अध्यक्ष आर वाय जाधव , पुणे जिल्हा अध्यक्ष धमाले , दौंड तालुका अध्यक्ष नामदेव खडके यांची उपस्थिती होती तर सभेच्या आयोजन नियोजनाची जबाबदारी ठाणे मनपा कार्यकारणी घेतली होती व यशस्वी रीतीने पूर्ण केले.