राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : मागील चार ते पाच दिवसापासून दोन माकडाने उपद्रव घेतला असून अनेकांना चावा घेतला आहे याच बाबींची वनपरीक्षेत्र कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळीच दखल घेत तिन माकडाला अखेर बंदिस्त केले आहे. दि. 3 एप्रिल रोजी इबाद रियाज सैय्यद वय 13 व इतर बालकांवर माकडाने हल्ला केला. त्यामुळे शहरातील रस्त्याने जाणाऱ्या महिला, पुरुष, व बालकामध्ये भयभीतीचे वातावरण तयार झाले होते.
त्याचीच दखल घेत डॉ.बी एन स्वामी उपवनसंरक्षक पुसद, यांच्या आदेशान्वये शशांक कदम सहाय्यक वनसंरक्षक( प्रादे.वन्यजीव )व राऊत वनपरिक्षेत्र अधिकारी दिग्रस, यांचे मार्गदर्शनाखाली शेख मुखबीर शेख गुलाब (वनक्षेत्रपाल फिरते पथक पुसद ) तथा जल कृती दल प्रमुख पुसद याच्या नेतृत्वाखाली रेस्क्यू करण्यात आले. पि.के जाधव क्षेत्र साहेब दिग्रस, रीता चव्हाण वनरक्षक दिग्रस, गिरीश डांगे वनरक्षक, रवी राठोड वनरक्षक, केशव गेडाम किरण सातपुते,तेजस पांढरे,यावेळी उपस्थित होते.





Social Plugin