Ticker

6/recent/ticker-posts

खटाव तालुक्यात १३३ ग्रामपंचायती संरपंच आरक्षण जाहीर



बुध दि .[ प्रकाश राजेघाटगे]

    खटाव तालुक्यातील १३३ ग्रामपचंयती सन २०२५ ते २०३० या वर्षांसाठी आरक्षणाची प्रवर्ग निहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात . यावेळी प्रातांधिकारी उज्वला गाडेकर , तहसिलदार बाई माने , अप्पर तहसिलदार अनिकेत पाटील , गटविकास अधिकारी जस्मीन शेख आदिची प्रमुख उपस्थिती होती .

            येथील पंचायत समिती बचत सभागृहात अनुसूचित जाती , नागरीकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गासाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत निश्चित करण्यात आली . यामध्ये अनुसूचित जाती साठी १२ सरपंच , नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित ३५ सरपंच पद व सर्वसाधारण प्रवर्गासाठी ८६ सरपंच पद सोडत जाहीर करण्यात आली .

               यामध्ये सर्वसाधारण महिला सरपंच साठी ४३ गावे पुढील प्रमाणे - पाचवड , रहाटणी , गुरसाळे , पुसेसावळी , येरळवाडी , वांझोळी , कळंबी , ललगूण , कटगूण , पडळ , पुसेगाव , पेडगाव , जाखनगाव , पांढरवाडी , गारळेवाडी , नढवळ , मरडवाक , नांदोशी , धकटवाडी , पवारवाडी , डांभेवाडी , पारगाव , चिंचणी , मोळ , गारुडी , गिरीजाशंकरवाडी , डाळमोडी , मुसांडवाडी, वाकेश्वर , मांजरवाडी, गुंडेवाडी , खबालवाडी , वेटणे , रेवलकरवाडी , जांभ , नागनाथवाडी , गोसाव्याचीवाडी , गादेवाडी, धोंडेवाडी , काळेवाडी , भोसरे , खातगुण , ढोकळवाडी .

         सर्वसाधारण सरपंच पुढील प्रमाणे -  खटाव , कामथी तर्फ परळी , गोरेगाव वांगी , पळशी , पिंपरी , मायणी , दातेवाडी , यलमरवाडी , उंबर्डे , नायकाचीवाडी , बोंबाळे , माने - तुपेवाडी , भुरकवडी , उबंरमळे , हिवरवाडी , फडतरवाडी ( बुध ) , नवलेवाडी , पांगरखेल , वाकळवाडी , दरुज , शिरसवडी , औंध , फडतरवाडी ( नेर), अनपटवाडी , बुध , कुमठे , वडगाव , पुणवडी , कातरखटाव , गोरेगाव ( निमसोड ) , मुळीकवाड़ी , कान्हरवाडी , होळीचागाव , येळीव , भांडेवाडी , कानकात्रे , म्हासुर्णे , सातेवाडी , बनपूरी , खरशिंगे , कातळगेवाडी , काटेवाडी व लांडेवाडी .

        अनुसूचित जाती महिला - भूषणगड, कोकराळे , त्रिमली , धारपुडी , तडवळे व निमसोड 

         अनुसूचित जाती खुला  - पुढील प्रमाणे - कणसेवाडी , गारवडी , सुर्याचीवाडी , वर्धनगड ,दरजाई व शेनवडी .

      नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला  पुढील प्रमाणे - अनफळे , गोपूज , विखळे , कुरोली , चोराडे , अंभेरी , लोणी , गणेशवाडी , जायगाव , दहिवड , मोराळे , रणशिंगवाडी , खातवळ , एनकूळ , नेर , तरसवाडी , चितळी व वरुड .

       नागरीकांचा मागासवर्ग खुला पुढील प्रमाणे - कलेढोण , पळसगाव , पोपळकरवाडी , रेवली , निढळ , वडी , अंबवडे , मांडवे , राजापूर , कारंडेवाडी , राजाचेकुर्ले , उंचीठाणे , हिंगणे , डिस्कळ , शिंदेवाडी , विसापूर व लाडेगाव .

            या आरक्षण चिठ्ठी सोडत करताना छत्रपती शिवाजी हायस्कूल चे विद्यार्थी आरव काटकर व निनाद गुरव यांच्या सोबत मंडलाधिकारी सचीन कर्णे आणि सुषमा बुरुंगले सह गावोगावचे विविध पक्षाचे कार्यकर्ते , नागरीक उपस्थित होते .