बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी निमित्त महिला आरोग्य जागृती अभियान अंतर्गत सी.बी.सी.(Complete Blood Count CBC बी.एस.एल.आर.(Blood Sugar level Random) रक्त चाचणी पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.ओंकार हेंद्रे व श्री. जय नवले तसेच महाविद्यालयामधील राष्ट्रीय सेवा योजना भागामार्फत महाविद्यालयातील विद्यार्थिनीची रक्त चाचणी तपासणी केली. महिला आरोग्य जागृती अभियाना अंतर्गत कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.किरण कुंभार , प्रा.हनुमंत निमसे यांनी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी. भोसले व प्रा.डॉ. संजय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान यशस्वीपणे राबविले. रक्त तपासणी शिबिरासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Social Plugin