*संकट मोचन मित्र मंडळ तर्फे कुटुंबाचे सत्कार*
मालेगाव / प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मेडशी :मालेगाव तालुक्यातील मेडशी गावाचे रहिवासी रामजी चिंकाजी तायडे यांचे नातू सेवानिवृत्त रेंजर मधुकर रामजी तायडे यांचे लहान चिरंजीव अमोल मधुकर तायडे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी बहुसंस्थेमार्फत सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती
या भरती मधल्या प्रकल्पग्रस्त प्रवर्गासाठी असलेल्या 7 रिक्त जागे पैकी अमोलने एका जागेवर आपल्या शैक्षणिक कौशल्य व जिद्द चिकाटी आत्मविश्वासाच्या बळावर यश संपादन करून आपले स्वतःचे व कुटुंबाचे तसेच मेडशी गावाचे नाव लौकिक केल्याबद्दल मेडशी येथील संकट मोचन मित्र मंडळ तथा पत्रकार विठ्ठल विष्णू भागवत, पत्रकार जावेद धन्नू भवानीवाले, सामाजीक कार्यकर्ते संतोष बबन तायडे आदीनी त्याच्या निवासस्थानी सह कुटुंबाचे अभिनंदन करून सत्कार केले.
अमोल मधुकर तायडे यांच्या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण असून, सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी गावकरी, शिक्षक, मित्रमंडळी आणि नातेवाईक सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती आई सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या शैक्षणिक विचारांना प्रेरित होऊन व्यवस्थित रित्या शिक्षणाची कास धरून. आपल्या शैक्षणिक कौशल्याच्या बळावर अमोल ने यश प्राप्त करून कुटुंबासमवेत मेडशी गावचे नावलौकिक करून गावातील युवकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे ही बाब आम्हा मेडशीवासी साठी खूप गर्वाची आहे





Social Plugin