सावध असा! सावध असा!
बालपण चोरणारा चोर आलाय!
चोर आलाय आमच्या घरात
चोर आलाय तुमच्या घरात
चोर आलाय नगर-महानगरात
चोर आलाय खेड्यापाड्यात
चोर आलाय वाडी-वस्तीत
चोर आलाय तांडा-बस्तीत
चोर लुबाडतो मुलांची भूक
घोर हिरावतो मुलांची झोप
चोर ओरबाडतो मुलांचा खेळ
चोर बळकावतो मुलांचा वेळ
चोर थोपवतो मुलांचा अभ्यास
अनाठायी मागे लावतो हव्यास
चोर हडपतो मुलांचा आनंद
चोर करतो संवादाचे दार बंद
घोर नेतो मुलांना एकाकी खाईत
चोर मुलांना भुलवण्यात पटाईत
ओळखलंत का चोर कोण?
तुमच्याच हातातला मोबाइल फोन
रामेश्वर तोंडे (कलाशिक्षक)
जि.प.हायस्कूल, मंगरूळ नवघरे ता.चिखली जि.बुलढाणा





Social Plugin