प्रतिनिधी/दादा जाधव
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अमर भीम तरुण मंडळ खामगाव यांचे तर्फे नवीन वैचारिक संकल्प राबवत गावातील बौद्ध विहारामध्ये ग्रंथालय व वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले
ग्रंथालयाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख उपस्थिती ही ग.वी. भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. सचिन गणपतराव भोसले साहेब ( Assistant General Manager Shree Dutta India Pvt. Ltd. Sakharwadi ), मा.विजय दत्तात्रय नलावडे ( Deputy Engeneer Watter Resource department of Maharashtra ) बी.जे. इंग्लिश मिडीयम स्कूलचे संचालक राहुल दिलीप जगताप साहेब, खामगांव ग्रामपंचायत सरपंच अर्चना नितीन जगताप, उपसरपंच किसन आप्पा झेंडे, खामगावचे ग्रामसेवक जाधव साहेब, ग्रामपंचायत सदस्य हिराचंद्र चाबुकस्वार, सपना वैभव वारे, संतोष महादेव सावळकर, प्रदीप जाडकर, प्राथमिक शाळा खामगांव शिक्षक वर्ग इत्यादी उपस्थितांनी या उपक्रमास पुस्तके देऊन खूप मोठी मदत केली व कार्यक्रमास येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच भविष्यात आवश्यक मदत करण्याचे आश्वासन देखील दिले.या उपक्रमाचे परिसरातून अमर भीम तरुण मंडळाचे विशेष कौतुक होत आहे





Social Plugin