पाटण ( दिनकर वाईकर)
महाराष्ट्र,कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले पाटण तालुक्यातील येराड गावचे श्री क्षेत्र येडोबा देवाची यात्रा शनिवार दि.12 पासून सुरू होते . पाटण पासून पश्चिमेकडे ६ किलोमिटर अंतरावरील कोयना नदिच्या तीरावर निसर्गरम्य ठिकाणच्या येराड(बनपेठ) येथील श्री तीर्थक्षेत्र येडोबा देवाचे भंव्य असे मंदिर प्रसिध्द आहे. हेमाडपंथी असलेले हे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरात प्रवेश करताच समोरील भव्य नंदिची मुर्ती व मंडपातील विशालकाय कासव भाविकांचे लक्ष आकर्शीत करूण घेते.तसेच प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश केल्या नंतर समोरील गाभाय्रातील २ भव्य दगडी मूर्तीचे दर्शन होते. त्यानां रडवे असे संबोधले जाते. श्री येडोबा देव व जोगेश्वरी देवी यांच्या लग्नाच्या वेळी हे देवीचे भाऊ रुसून बसले होते अशी आंख्यायिका आहे श्री .येडोबा मंदिराच्या पूर्वेला श्री नाईकबां देवाचे देवालय असून मंदिरा , समोर आकर्षक अशी दिपमाळ आहे भाविकांचे नवसाला पावणारा देव म्हणून श्री येडोबा देवाची ख्याती आहे. श्री येडोबा देव व जोगेश्वरी देवी यांच्या लग्न झालेले हे स्थान असून जोगेश्वरी देवी ही माता पार्वतीचा अवतार मानली जाते.
एप्रिल महिन्यातील चैत्र पौर्णिमेतील हनुमान जयंती या दिवशी या यात्रेला प्रारंभ होतो. ७ दिवसांच्या या यात्रेतील पहिले ३ दिवस महत्वाचे मानले जातात . कोल्हापूर जिल्ह्यातील वाडिरत्नागिरी येथील जागृत देवस्थान श्री जोतिबा मंदिरातील शिधा येराड गावी आणला जातो. व नंतर येडोबा देवाच्या यात्रेच्या सर्व विधिनां प्रारंभ होतो.चैत्र पौर्णिमेदिवशी (हनुमान जयंती या दिवशी श्री क्षेत्र येडोबा देवाच्या देवाला तेल चढवले जाते. नेरळे ता, पाटण येथील श्री येडोबाची बहीण जानुबाई देवीस करवली म्हणून मान दिला जातो. हनुमान जयंती दिवशी म्हणजेच यात्रेच्या पहिल्या दिवशी रात्री उशीरा नेरळे येथील येडोबा देवाची बहीण श्री जानुबाई देवीस आणण्यासाठी देवाचे मानकरी देवाचे पालखी व मानाचे मानकरी व सासनकाठी आणण्यासाठी श्री येडोबा देवाचे मानकरी पालखी घेऊन ग्रामस्थ , मानकरी व पुजारी या रितीरिवाज प्रमाणे मानाने रात्री उशीरा आणतात . पौर्णिमेदिवशी पासून मंदिर परिसरात यात्रा काळात मंगळवेढा परिसरातील धनगरी ओव्या म्हणल्या जातात.
पहाटे ४ वाजता येडोबा देवाच्या लग्न विधिस प्रारंभ होईल .यात्रा काळातील छबिण्या च्या सासनकाठीचा मान सुरूल , वरकड, काळमवाडी, गुंजाळी, पेठ - नेरळे, नेरळे, वाटेगाव, काले, झाकडे, नाटोशी आदि गावानां दिला जातो.रविवार दि 13 तारखेला दुपारी १२ वाजता लहान छबिना, व रात्री १२ ला रात्री चा छबिना. सोमवार दिनांक 14 रोजीस यात्रेचा मुख्य दिवस आहे . या दिवशी दु १२ वाजता मोठा छबिना, दु ३ वाजता धार घालणिचा विधी व रात्री १२ वा अंधारात यात्रेतील मुख्य रिंगावण विधी होणार आहे





Social Plugin