Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत खापा येथे ५% दिव्यांग निधी वितरित



प्रतिनिधी शैलेश कवळे 


खापा : दिव्यांग (अपंग) बांधवांना माना-सन्मानाच जीवन जगता यावे या करिता शासनाने ग्रामपंचायतीच्या वार्षीक उत्पन्नाच्या ५% नीधी हि दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी खर्च करावयाची असते.आज दिनांक १० एप्रिल २०२५ रोजी ग्रा.पं. खापा तर्फे दिव्यांग बांधवांना ५% नीधी वितरीत करण्यात आला. यावेळी प्रत्येक दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर एक आनंदचा क्षण होता.

      दिव्यांग बांधव नेहमीच दिव्यांग संघटनेच्या तुमसर तालुका कार्यालयात येवुन तुमसर तालुका प्रमुख श्री शेषरावजी गणविर यांना ५% नीधी बाबत विचारणा करीत असत. गणविर साहेबांच्या पुढाकराने आज संपुर्ण दिव्यांग (अपंग) बांधवांना ५% नीधी वितरीत करण्यात आला.गणविर साहेबांनी सांगीतल की दिव्यांग संघटना हि सन्माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनात सदैव दिव्यांग बांधवांच्या हितासाठी कार्य करीत असते, त्यांच्या कोणत्याही समश्या असोत त्या सोडविण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करतो.

याप्रसंगी खापा ग्राम च्या प्रथम नागरीक सौ. कीर्तीताई पिकलमुंडे,उपसरपंच श्री हंसराजजी ठवकर,ग्रा.पं.खापा चे सर्व सदस्य,भरने साहेब ग्रा.विकास अधिकारी खापा, राजेंद्र भाऊ पिकलमुंडे, शेषराव गणविर (दिंव्याग संघटना प्रमुख),दिव्यांग बांधव चंद्रकला ठवकर, रामदयाल कोलवते, धनराज ठवकर, चंद्रभान कोलवते, कैलास अतकरी, अजय मोहतुरे, लक्ष्मी नारायण अतकरी, सुनील ठवकर, जयशन्कर कणपटे,  टवरचंद हाडगे, घनश्याम भोयर, विषणु भोयर, सागर शेंडे, गोपिका टेटे, सर्व दिव्यांग खापा गावातील दिव्यांग बांधव उपस्थित होते.