Ticker

6/recent/ticker-posts

विविध सेवाभावी संस्थेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन



अतनूर / प्रतिनिधी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या.जयंतीनिमित्त जळकोट तालुक्यातील अतनूर परिसरात सामाजिक समतेचा आणि बौद्ध मूल्यांचा सन्मान करणारा अभिवादन कार्यक्रम अत्यंत अनुशासित व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

यावेळी लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळ कार्यालयात प्रदेशअध्यक्ष बी.जी.शिंदे, महिला आघाडीच्या प्रदेशअध्यक्षा सौ.संध्या शिदे, युवानेते दिलीप कोकणे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी गव्हाणे-पाटील, राष्ट्रवादीचे चंद्रशेखर पाटील, जिजामाता महिला मंडळाच्या वतीने अध्यक्षा सौ.एस.बी.शिंदे, वसुंधरा महिला मंडळाच्या वतीने अध्यक्षा सौ.रूक्मिणी सोमवंशी, जनक्रांती डोंगरी विकास बहुउदेशीय सेवाभावी संस्था अतनूर च्या वतीने अध्यक्ष व्यंकटेश शिंदे, साधुराम ग्रामीण विकास बहुउदेशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राजकुमार कापडे, चंदर पाटील, पोलिस पाटील प्रकाश पाटील, जयहिंद क्रिंडा व व्यायाम शाळेच्या वतीने आर.एल.बाबर, अँड.नवाज मुंजेवार, हिपळणारी ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच श्रीमती इंद्ररबाई रामचंद्र शिंदे, उपसरपंच, ग्रामसेवक व मानवी हक्क स्वंरक्षण व जागृती संघटनेचे जिल्हाअध्यक्ष चंद्रकांत शिंदे, कै.रामचंद्र शिंदे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सचिव सौ.श्वेता शिंदे, दलित मित्र बी.जी.शिंदे यांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकराच प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच याप्रसंगी विविध सामाजिक, शैक्षणिक, सेवाभावी संस्था, महिला मंडळ व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांना पूर्वक आभिवादन केले. 

यावेळी या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी व दलित मित्र तथा शासन नियुक्त ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तथा महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, संविधानामुळेच आज आपण समानतेने जगू शकतो. ही अधोरेखित करत बाबासाहेबांच्या करायचे आठवण करून दिली. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजात समता, बंधूता आणि न्याय या मूल्यांची रुजवणूक करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना अल्पोहर व पाणी वितरणाची व्यवस्था केली होती. या जयंती उत्सवाने संपूर्ण परिसरात व तालुक्यात सामाजिक ऐक्य, बौद्धिक संस्कृतीचे मौल्यवान विचार आणि संविधानिक भान जागृत केले.

 तसेच तालुक्यातील गावागावांमध्ये हे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात संविधान जागर शपथ व महिला जागर, शाळा व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून प्रभात फेरी, व्याख्यानमाला, सामूहिक वाचन, संस्कृती कार्यक्रम व विविध स्पर्धा अशा उपक्रमामध्ये डॉ‌.आंबेडकरांचे विचार समाजात मोजण्याचा प्रयत्न झाला.असे दलित मित्र तथा ग्राहक संरक्षण परिषदेचे शासन नियुक्त सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.