राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : तालुक्यातील कलगाव हे गाव तिस ते चाळीस वर्षा पासून विहीर अधिग्रहणावर पाण्याची तहान भागवत आहे.त्यासाठी कायम स्वरुपी उपाय योजना व्हावी म्हणून चार वर्षे आधी राष्ट्रीय पेयजल योजनेतून नऊ किलोमीटर अंतरावरील लोणी येथून पाईप लाईन पालकमंत्री संजय राठोड यांनी मंजूर करून दिली.शासकीय यंत्रणा व ठेकेदाराने अद्यापही पुर्णत्वास न नेल्याने गावाची पाणी टंचाई कायम राहीली आहे.दिग्रस तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे.गावातील सर्वात मोठी समस्या ही पाणीची आहे.परीसरात कॅनवल, धरणं नसल्याने गावातील पाण्याचे स्रोत हंगामी स्वरूपाच्या असतात पाऊस जास्त झाले की फेब्रुवारी -मार्च महिन्या पर्यंत पाणी पुरते पाऊस कमी झाले की फेब्रुवारी पासूनच पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.
अनेक वर्षा पासून काही प्रमाणात पाणी असलेल्या विहिवरुन अधिग्रहण केल्या जाते.पालकमंञी संजय राठोड यांनी राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करून निधी उपलब्ध करुन दिला चार वर्षे होऊनही गावात पाणीच आले नाही यासाठी गटविकास अधिकारी यांच्या कडे अनेक वेळा तोंडी व लेखी तक्रारी दिल्या गेल्या वर्षी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली संबंधीतांना काम पुर्ण करण्याची ताकीदही दिली.परंतू ठेकेदार वरचढ ठरत आहे का असा प्रश्न पडतो.गावकरी मोठ्या आशेने गावाची पाण्याची तहान भागेल प्रतीक्षेत आहेत.जलजिवन मिशन योजनेतून सन २०२०-२१ ला १६ लाख पंचेवीस हजार ४४०रुपये मंजूर करण्यात आले.परंतू त्याही योजनेतील विहिरीचे खोदकाअर्धवटआहे.कामाचे कालावधी संपल्यानंतर ही कामे पुर्णत्वास जात नसल्याने शासकीय यंत्रणा कमी पडत असल्याचे सांगितले जात आहे.गावातील नागरीकानी ग्रामसेवक व पुढार्याना लेखी तक्रार देऊन उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे.
( ठेकेदाराला सांगितले आहे दोन दिवसांत राहिलेले काम पुर्ण करण्याची ताकीद दिली आहे. ग्रामसेवक उमरकर )





Social Plugin