मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव : गांव नमुना ७/१२ वरील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अद्ययावत करून मयत खातेदारांच्या नोंदीचे कामकाज पुर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत "जिवंत सातबारा" मोहित राबविण्यात येत आहे.
सदर मोहिम राबविण्यासाठी खालील प्रमाणे कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आले आहे. दि. ०१/०४/२०२५ ते दि. ०५/०४/२०२५ ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) यांनी त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावडी वाचन करून न्यायप्रविष्ठ प्रकरणे सोडुन गाव निहाय मयत खातेदार यांची यादी तयार करणे.तसेच दि. ०६/०४/२०२५ ते दि. २०/०४/२०२५ वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे (मृत्यु दाखला, वारसाबाबत सत्य प्रतिज्ञालेख/स्वयं घोषणापत्र, पोलीस पाटील / सरपंच/ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसांचे नावे, वय, पत्ते व दुरध्वनी क्रमांक /भ्रमणध्वनी क्रमांक, रहिवासी बाबतचा पुरावा ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे सादर करणे व ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) यांनी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांचे मार्फत वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजुर करणे.)
दि. २१/०४/२०२५ ते दि. १०/०५/२०२५
ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा. त्यानंतर म.ज.म.अ.१९६६ च्या विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफार वर निर्णय घेऊन त्यानुसार ७/१२ दुरूस्त करावा जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती ७/१२ वर नोंदविलेल्या असतील.
* सदर मोहिमेतंर्गत वारस नोंदीकरिता अर्ज ई-हक्क प्रणालीमार्फतच नोंदीविणेत यावा.
* सर्व खातेदारांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवुन "जिवंत सातबारा मोहिम" यशस्वी करावी.असे अहवान शासनाकडून केले जात आहे





Social Plugin