बाळापूर प्रतिनिधी : राजेश दामोदर :
बाळापूर तालुक्यातील ग्राम हाता येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पन करून रॅली काढण्यात आली .डी जे साऊंड च्या उत्साहाने भिमसैनिकांनी रॅलीची सुरुवात केली असता संपूर्ण गावातून नाच गाण्याच्या उत्साहात भिमसैनिकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली .
आणि संपूर्ण गावातून रॅली झाल्या नंतर विहारात सामुहिक वंदना घेऊन भिम जयंतीचा कार्यक्रम संमाप्त करण्यात आला . तसेच अन्याय आणि विषमता यांच्या विरुद्ध 'लढणारा महामानव – प.पू. भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा .
समाजातील प्रत्येक दुर्बळ, वंचित आणि शोषित घटकाच्या हक्कासाठी अखंड झगडणारा एक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या जन्मदिनी केवळ अभिवादन करणे पुरेसे नाही, तर त्यांच्या विचारांचा वारसा अंगीकारणे हीच खरी आदरांजली ठरेल.डॉ.आंबेडकरांनी केवळ संविधानाची रचना केली नाही, तर एक नवा सामाजिक विचार आपल्याला दिला तो म्हणजे समानतेचा, स्वाभिमानाचा आणि आत्मसन्मानाचा. शिक्षण, स्वावलंबन आणि संघटन हे त्यांचे तीन मूलमंत्र आजही प्रेरणादायी ठरत आहेत. डॉ . बाबासाहेब यांच्या कार्यामुळे आज अनेकांना सन्मानाने शिक्षणाचा, जगण्याचा आणि न्याय मागण्याचा अधिकार मिळाला. त्यांनी दाखवलेला सत्य, करुणा व संघर्ष यांचा मार्ग हा आजच्या तरुण पिढीसाठीही दीपस्तंभ आहे.
चला आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण एक संकल्प करूया —
"विषमतेला नाही, माणुसकीला हो!
शोषणाला नाही, समानतेला हो!
अंधश्रद्धेला नाही, वैज्ञानिक दृष्टिकोनाला हो!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हीच आपली शक्ती आहे — समाज परिवर्तनासाठी, नवभारत निर्मितीसाठी!
"जो पर्यंत समाजात विषमता आहे, तोपर्यंत स्वातंत्र्य म्हणजे फसवणूक आहे." – डॉ.बाबासाहेब आंबेडकरजय हिंद ! जय भीम! नमो बुद्धाय!जय भारत!





Social Plugin