भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे .
तालुका प्रतिनिधी मारोती गाडगे/गेवराई
गेवराई (बीड):-
गेवराई शहरातील श्रीराम मंदिर येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात रविवार दि.३० मार्च ते दि.७ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी श्रीराम भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदिर संस्थान व श्रीराम भक्त मंडळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रभु श्रीरामचंद्र जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त श्रीराम मंदिर, गेवराई येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रविवार दि.३० मार्च २०२५ रोजी रुद्राभिषेक व घटस्थापना, मंगळवार दि.०१ एप्रिल रोजी श्री.डॉ.मुकुंद महाराज मुरलीधर (गोंदीकर) यांचे संगीत भागवत कथा दुपारी १२ ते ०५ पर्यंत व श्री. विष्णु महाराज बांडे (युट्युब स्टार) यांचे भारुड सायं.७:३० वा, बुधवार दि.०२ एप्रिल रोजी कु.सिध्देश्वरी कोकाटे (संगीत विशारद) यांचे सायं.७:३०वा.स्वरांजली संगीत रजनी , गुरुवार दि.०३ एप्रिल रोजी ह.भ.प. आशाताई चपळगांवकर यांचे सायं.७:३० वा. कीर्तन, शुक्रवार दि.०४ एप्रिल रोजी रामायणाचार्य ह.भ.प.प्रेमलताई डेंगळे यांचे सायं.७:३० वा. किर्तन, शनिवार दि.०५ रोजी
सायं. ७:३० वा. सांस्कृतिक कार्यक्रम (नृत्य, नाटिका, संगीत स्पर्धा) , रविवार दि.०६ एप्रिल रोजी श्री.ह.भ.प.पांडुरंग महाराज गव्हाणे (आळंदीकर) यांचे सकाळी १० वा. काल्याचे किर्तन तर सोमवार दि.७ एप्रिल रोजी दुपारी ०१ ते ०५ दरम्यान भागवत कथा समाप्ती व नंतर महाप्रसाद देण्यात येईल तरी श्रीराम भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक संस्थान श्रीराम मंदिर व श्रीरामभक्त गेवराई यांच्या वतीने करण्यात आले आहे.





Social Plugin