देगलूर/प्रतिनिधी
ईदच्या पवित्र आणि आनंदमय प्रसंगी हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत शिरकुर्म्याच्या घोटाने बंधुत्व साजरे केले. पत्रकार संरक्षण समिती व साप्ताहिक देगलूर टाइम्स परिवाराच्या वतीने आयोजित ईद मिलाप सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
संपर्क कार्यालय, पत्रकार संरक्षण समिती येथे झालेल्या या कार्यक्रमाला मतदारसंघातील लोकप्रिय आमदार जितेश अंतापूरकर, देगलूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मारूती मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. तसेच शहरातील प्रतिष्ठित व्यापारी एकनाथ टेकाळे यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांनीही हजेरी लावली.
समाजातील सलोखा आणि एकोपा वृद्धिंगत करण्यासाठी या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार संरक्षण समिती देगलूरचे अध्यक्ष शेख असलम (कार्यकारी संपादक – साप्ताहिक देगलूर टाइम्स), संघटनेचे संघटक तथा साप्ताहिक देगलूर टाइम्सचे संपादक गजानन शेषेराव टेकाळे, तसेच संघटनेचे कार्याध्यक्ष आणि देगलूर टाइम्स लाईव्हचे प्रतिनिधी धनाजी देशमुख यांनी केले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे सहसचिव मनोज बिरादार, शेख अफान आदींनी परिश्रम घेतले.
"चला, सलोख्याची ईद, एकोप्याने साजरी करूया!" या संदेशाने ईद मिलाप सोहळा सर्वांच्या मनात एकात्मतेची भावना जागवून गेला.





Social Plugin