यशवंत पवार@ छत्रपती संभाजीनगर
आरटीई प्रवेशपात्र सर्व इंग्रजी शाळांना प्रतिपूर्तीची रक्कम वाटप करतांना भेदभाव न करता समान निधी द्यावा यासाठी काल साय 5:00 वाजता इंग्लिश स्कूल्स महासंघ पदाधिकारी यांनी प्रदेशउपाध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश सहसचिव रत्नाकर फाळके व जिल्हाध्यक्ष भगवान पवार यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणाधिकारी (प्राथ.) कार्यालयात चेंबर बंद आंदोलन करण्यासाठी गेले असता शिक्षणाधिकारी दालन बंद असल्याने घेराओ आंदोलन करण्यात आले असता कक्ष अधिकारी प्रदिप राठोड यांनी समोर येवून निवेदन स्विकारून शिष्टमंडळा बरोबर सविस्तर चर्चा केली असता इंग्लिश स्कूल्स महासंघाच्या नेतृत्वा खाली कोर्टात गेलेल्या 61 शाळांना देण्यासाठी निधी प्राप्त झाला असून पुढील आठवडयात थकित रक्कमेसह शाळेंच्या खात्यात जमा होईल .
ज्या शाळा कोर्टात गेल्या नाही त्यांना 83% प्रमाणे 2023 - 24 एका वर्षाची रक्कम मिळेल. ज्यांना अद्याप चार वर्षात काहीच निधी मिळाला नाही त्यांनासुद्धा एप्रिल महिना अखेर देण्याचा प्रयत्न आहे असे सांगितले . इंग्लिश स्कूल्स महासंघाचे प्रदेश सहसचिव रत्नाकर फाळके म्हणाले की, आरटीई रक्कम वाटप करतांना सर्व शाळांना समान निधी वाटप व्हावा त्यामध्ये भेदभाव करू नये अशी मागणी केली. आरटीईची रक्कम वितरीत करण्यासाठी आठ दिवस लागणार असल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे तूर्त येवू नये असे आवाहन संबंधित लिपिक श्री राजपूत व जिल्हा प्रमुख भगवान पवार यांनी केले आहे .
या शिष्टमंडळात इंग्लिश स्कूल्स महासंघाचे प्रदेश.सह सचिव योगेश अंभोरे , पोपट खैरनार , संतोष सोनवणे , गजानन नालमवार, गणेश जाधव ,संजय कुलकर्णी, पंकज ढाकणे , शेख सर तसेच मेष्टाचे मनिष हांडे , सुनील मरकड , श्रीनगरकर श्री कानिटकर, श्री काळे आदी सहभागी होते .





Social Plugin