Ticker

6/recent/ticker-posts

कन्नड शहरात नवीन पोलीस चौकी संदर्भात आ. संजना जाधव यांची गृहराज्यमंत्री यांच्याशी चर्चा



यशवंत पवार @छत्रपती संभाजीनगर  

गेल्या महिन्यात कन्नड शहरात झालेल्या दोन गटातील बाचाबाची नंतर कन्नड शहरातील कायदा व  सुव्यवस्था विस्कळीत होण्याच्या मार्गावर होती. परंतु पोलिसांनी वेळीच अटकाव केल्याने मोठा अनर्थ टळला .

   परंतु भविष्यात कन्नड शहरातील कायदा व सुव्यवस्था आबादित राखण्यासाठी ,नवीन पोलीस चौकी देण्यात यावी यासह तालुक्यातील विविध विकास कामासंदर्भात कन्नड- सोयगाव तालुक्याच्या आ. संजना जाधव यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्याशी चर्चा केली.

     ना. योगेश कदम हे छत्रपती संभाजी नगर जिल्हा दौऱ्यावर आले असता आ.संजना जाधव यांनी त्यांचे स्वागत केले, त्यानंतर कन्नड मतदारसंघातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच अवैध धंद्याना लगाम बसावा यासाठी, महिला सुरक्षा  बाबतचा मुद्दा याबाबतीत लक्ष घालून शहरातील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाजवळ नवीन पोलीस चौकी सुरू करण्यात यावी याविषयी गृहराज्यमंत्री ना. कदम यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यास त्यांनी सकारात्मकता दाखवली.

    तसेच तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था याबाबतीतही लवकर निर्णय  घेण्यात येऊन आवश्यक त्या ठिकाणी पोलीस चौकी सुरू करून मनुष्यबळ वाढवले जाईल असे गृहराज्यमंत्री ना. कदम यांनी सांगितले.