Ticker

6/recent/ticker-posts

अंबड येथे महावीर जन्मकल्याण दिवस मोठ्या उत्साहात साजरा



 अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ

 आज अंबड शहरात सकल जैन समाज बांधवांच्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याण दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.1008 भगवान महावीर मंदिरा पासून भगवान महावीरांच्या शोभा यात्रेला सुरुवात झाली,अंबड शहरातील सकल जैन समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात शिस्तीचे पालन करत लहानांपासून ते वयस्करा पर्यंत सर्वांचा सहभाग या शोभा यात्रेत मोठ्या उत्साहाने दिसून आला.ही शोभायात्रा नाथ्रेकर चौक मार्गे चंद्रप्रभू भगवान मंदिर, शांतिनाथ भगवान मंदिर येथे पोहोचून पुढे गणपती गल्ली, महाराष्ट्र द्वार,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,बस स्थानक मार्गे महावीर चौक येथे येऊन मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदना होऊन धार्मिक विधीसाठी 1008 भगवान महावीर मंदिरात पोहचली. 

   भगवान महावीर जन्म कल्याणक दिवस सकल जैन धर्मियांसाठी महत्त्वपूर्ण असून हा दिवस अहिंसा सत्य करुणा या सिद्धांतानुसार जगाला शांततेचा मार्ग दाखवणारा म्हणूनबघितले जाते,या पवित्र दिवशी  पहाटेपासूनच संपूर्ण जैन समाज विशेष प्रार्थना अनुष्ठान धार्मिक विधी दान पुण्याच कार्य करतात  हा दिवस संपूर्ण जगासह जैन धर्मियांसाठी आत्मचिंतन अध्यात्मिक विकासाचा एक स्वर्णम दिवस आहे. जैन धर्मियांचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीरांनी दिलेल्या संदेशात  जीवनातील सर्वात मोठा अहिंसेचा धर्म जगाला जीओ और जीने दो या तत्त्वावर मार्गदर्शक ठरत असून सत्य अहिंसा अपरिग्रह ब्रह्मचर्य आणि अस्तेय यावर आधारित या धर्माची शिकवण असून जगाला भगवान महावीरांचा हा संदेश आपणही जगा आणि इतरांनाही जगू द्या नुसार मार्गदर्शक ठरत आहे .भगवान महावीरांच्या शोभा यात्रेत अंबड शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती होती यावेळी माजी मंत्री राजेश टोपे यांनीही मंदिराला भेट देत महावीर कल्यानक दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.