Ticker

6/recent/ticker-posts

डॅा बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी



ग्रमिण प्रतिनीधी : यादवराव बुराडे

 डॅा बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणुन ओळखल्या जातात, बाबासाहेब यांनी अत्यंत विपरीत परिस्थीत शिक्षण घेत त्यांनी परिस्थीतीवर मात करुन आपले शिक्षण पुर्ण केले व ज्या बहुजन व दलीत समाजाला अस्पृश्यतेचे जीवन जगाव लागत होते त्या समाजासाठी बाबासाहेबांनी स्व:त लढा दिला व आज करोडो अनुयायी माना-सन्मानाच जिवन जगत आहे. हि पुण्याई माझ्या बाबासाहेबांची. अशाच महामानवाला त्रिवार अभिवादन. 

अशा या महामानवाची आज दिनांक १४ एप्रिल जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. आज प्रमुख मान्यवरांच्या उपस्थीतीत पंचायत समिती तुमसर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी श्री माननीय राजूभाऊ कारेमोरे (आमदार तुमसर/मोहाडी विधानसभा क्षेत्र), एन. डी. वाडेकर (BDO)सर, सौ.दीपिका सुमित गौपले मैडम (सभापती प.स.तुमसर), सुभाष बोरकर साहेब (उपसभापती प.स.तुमसर) शेषराव गणवीर (प्रहार दिव्यांग संघटना तुमसर तालुका प्रमुख) तसेच खापा/तुमसर येथील बौध्द बांधव यांच्या प्रमुख उपस्थीतीत कार्यक्रम पार पडला.