Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जल्लोषात मिरवणूक संपन्न



 गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी

तालुक्यात १४ अप्रैल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, आज सकाळ पासूनच शहरातील बौद्ध बांधव मोठ्‌या संख्यात डॉ बाबसाहेब आंबेडकर चौकात हजर झाले होते कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व मान्यवरानी डॉ बाबासाहेब आंबेडकराचा प्रतीकात्मक पुतळ्याला मेणबत्ती, अगरबत्ती लावून,वंदना घेऊन पार पडले.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरानी मार्गदर्शन केले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर माहिती दिली सकाळ पासुनच चौका चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकराच्या पुतळ्या भोवती सजावट करण्यात आली होती व हजारों अनुयायाँनी महामानवाना अभिवादन करुण जय भीम चा जल्लोष केला दुपारी निघालेल्या मिरवणुकित हजारों भीम भक्त

सहभागी झाले मिरवणुकीत वाहनावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व जगाला शांतीचे मार्ग दाखविनारे भगवान गौतम बुद्धाच्या प्रतिमा ठेवून व डॉ बाबासाहेब आंबेडकराचे विचाराचे दर्जेदार फलक घेऊन शहरातून मिरवणूक काढण्यात आली या वेळी समाज सेवकानी चौका चौकात भीम भक्ता साठी नास्ता, खिचड़ी शरबत, थंड पाणीची सोय केली होती.