Ticker

6/recent/ticker-posts

राहेरी बु येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा



सिंदखेडराजा :- ज्ञानेश्वर तिकटे

सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी बु ,येथे  सालाबादाप्रमाणे याही वर्षी श्रीरामनवमी ( जन्मोत्सव ) निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन राहेरी बु, येथे करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे श्रीराम जन्मोत्सव व भव्य शोभायात्रा असे स्वरूप होते.दिवसभर संपूर्ण गावामध्ये भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

जि.प्रा शाळेत  सकाळी १० वाजता श्रीराम नवमी निमित्ताने7 श्रीराम कथेचे वाचन गोसावी महाराज यांनी केले दुपारी १२ वाजता गुलाल व फुलांची उधळण करीत श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महिलांची आणि श्रीराम भक्तांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. प्रभू श्रीराम यांची महापूजा करिता  7 जोडया बसवून पुजा  करण्यात आली.त्यामध्ये गावाचे प्रथम नागरिक सरपंच 1) सौ संता  बालाजी देशमुख सरपंच पती श्री बालाजी माधवराव देशमुख, 2 ) श्री मदन आबासाहेब देशमुख,सौ. संगीता मदन देशमुख, 3 )मंगेश रमेश बरांडे,सौ साक्षी मंगेश बरांडे ,4)  श्री शिवाजी प्रकाशराव देशमुख,सौ साधना शिवाजी देशमुख,5 ) श्री माधव लिंबाजी मंगळवेढे ,सौ मीरा माधव मंगळवेढे,6)श्री सुभाष मानसिंगराव देशमुख,सौ सुनंदा सुभाष देशमुख,7 ) श्री स्वप्निल सुभाषराव देशमुख,सौ रोहिणी स्वप्निल देशमुख यांनी माहापुजेसाठी सहभाग घेतला

  त्यानंतर ठीक 12 वाजता जन्मोत्सव व महाआरती करण्यात आली.त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन  महाप्रसादामध्ये भातपुलाव व शिरा समाविष्ट होता. सायंकाळी 6 वा. गावातील मुख्य प्रवेशद्वारतुन श्री छत्रपती शिवाजी महाराजांना च्या आरतीने सुरवात करून  सर्व गावामधून भव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये सर्व गावकरी यांचा समावेश होता. महिलांनी आपल्या घरासमोर रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या. प्रत्येक ठिकाणी महिलांनी श्रीरामाचे पुजन केले. जय श्री राम जय घोषाणे राहेरी बु नगरी दुमदुमली होती. या मिरवणूकीचे नेतृत्व सर्व गावकरी मंडळी यांनी केले होते. तर मिरवणुकीत सर्व गावकरी एकत्रीत झाले