मालेगांव प्रतिनिधी- जावेद धन्नू भवानीवाले
केंद्र व राज्य शासना च्या वतीने शेतकर्यांना देण्यात येणार्या पि एम किसान योजनेचे अनुदान पात्र असलेल्या लाभार्थीना देण्यात येत असते, परंतु शेतकर्याचे निधन झाल्यानंतर त्या शेतकर्याला मिळणारे अनुदान मय्यतीच्या नंतर शासनाकडे परत न करता त्या शेतकर्याच्या पत्नी ला किंवा त्याच्या वारसदाराला देण्यात आले पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल गंगाराम जाधव यांनी केली आहे.
शासनाची ही योजना शेतकर्यांना लाभ दायक असून थोडा फार या अनुदाना पासून शेतकरी मंडळींना आर्थिक मदत होते, ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो, परंतु त्या शेतकर्याचे निधन झाल्यानंतर, पुढील जमा झालेली रक्कम (अनुदान) शासनाकडे जमा केले जाते, हे जमा असलेली मय्यत शेतकर्यांनचे अनुदान त्यांच्या वारसदाराला मिळत नसल्याने लाभार्थी बँकेत व संबंधीत विभागात चक्करा मारत असताना दिसतात ,बँक म्हणते तहसिलदारांचे पत्र आणा, संमधित विभागातुन सांगितले जाते की शेतकरी मय्यतीच्या नंतर चे अनुदान शासनाकडे जमा करण्यात येत असते, तुम्ही वारस म्हणून कागदपत्रे सादर करा, व नंतर त्या पुढील अनुदान देण्यात येईल असे सांगितले जाते, मय्यत शेतकर्यांच्या वारस म्हणून प्रकिया करण्यास बराच कालावधी लागत असल्याने या लाभार्थीना शासनाकडे मय्यत शेतकर्यानंचे अनुदान न पाठवता शेतकर्यांच्या वारसदाराला देण्यात आले पाहिजे अशी मागणी अनिल जाधव यांनी केली आहे.





Social Plugin