Ticker

6/recent/ticker-posts

कृषी प्रदर्शनामध्ये अजय मोटघरे सर यांचे मार्गदर्शन


गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी-

मुर्तिजापूर येथे ३ एप्रिल रोजी झालेल्या दहाव्या कृषी प्रदर्शनात कारंजा येथील प्रगतिशील शेतकरी तथा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक अजय मोटघरे यांनी सहभागी होऊन उपस्थित शेतकऱ्यांना ड्रॅगन, आंबा, शेवगा आदी पिकांच्या लागवडीबाबत मार्गदर्शन केले. दरम्यान अजय मोटघरे यांची प्रकट मुलाखत जनमंचचे मार्गदर्शक अरुण बोंडे आणि पंकज खंडारे यांनी घेतली या प्रकट मुलाखतीमध्ये अजय मोटघरे यांनी आपल्या शेतात केलेला सेंद्रिय आणि जैविक शेतीचा प्रयोग कशाप्रकारे यशस्वी केला.

तो करताना आलेल्या अडचणी या सर्व बाबी त्यांनी शेतकऱ्यांसमोर स्पष्ट केल्या. वेळेवर आलेले अनेक प्रश्न अनेक समस्या कशा सोडविल्या याची इत्यंभूत माहिती त्यांनी शेतकरी बंधू-भगिनींना दिली. विशेष म्हणजे मुरमाड जमिनीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे पिके कसे घेऊ शकतो?हे त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पटवून दीले. याप्रसंगी मोटघरे यांनी आपल्या शैक्षणिक क्षेत्रात ज्या प्रकारे उल्लेखनीय कार्य केले त्याच प्रकारचे कार्य ते शेतीमध्ये सुद्धा करीत

असल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी आंतरभारतीचे सचिव प्रमोद राजनेकर,शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ वानखडे व ईतर मान्यवर उपस्थित होते.