बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झालेले नांदेडचे भूमिपुत्र ओमप्रकाश अजय कंधारे, वेदांत माधवराव पाटील, शिवराज राजेश गंगावळ, राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेले कृष्णा अक्कमवार, नागराज शिराळे तसेच सद्यस्थितीत बाहेरगावी असणाऱ्या लोकसेवा आयोगाच्या यशवंत विद्यार्थ्यांच्या पालकांचा आज चव्हाण कुटुंबीयांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी खुद्द खासदार अशोक चव्हाण यांनी सत्कार केला. आणि कुटुंबीयांचे इतर सदस्य यावेळी हजर होते.
Social Plugin