अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार ग्रामीण भागातील,वस्तीवरील गोरगरीब जनतेला राहण्यासाठी पक्के घर मिळावे या उद्देशाने घरकुल लाभार्थ्यास पाच ब्रास वाळू मोफत दिली जाणार आहे असे शासनाने जाहीर केले होते.आणि त्याचा वाहतूक खर्च लाभार्थ्यास करावा लागणार आहे या अनुषंगाने भालगाव ता.अंबड येथे पंतप्रधान आवास योजना-132,रमाई आवास योजना-42,शबरी आवास योजना-104,यशवंतराव चव्हाण घरकुल योजना-9 एकूण सरासरी=350 घरकुले मंजूर झालेली आहेत,परंतु घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी गोरगरीब लाभार्थ्यास वाळू उपलब्ध होत नसून आज रोजी बाजारात वाळूचे भाव गगनाला भिडलेले दिसून येतात.
घरकुल लाभार्थ्यास वाळू उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात मा.जिल्हाधिकारी जालना,उपविभागीय अधिकारी अंबड,तहसीलदार अंबड,गट विकास अधिकारी पंचायत समिती अंबड यांना दि 04/03/2025 रोजी लेखी निवेदन दिले होते,परंतु त्या निवेदनाच्या अनुषंगाने आज पर्यत कोणत्याही लाभार्थ्यास वाळू उपलब्ध झालेली नाही.वाळू अभावी घरकुल्याची कामे रखडली असून ते मुदतीच्या आत होणे आवश्यक आहे,वाळू मिळाल्यास लाभार्थी वाळूचा वाहतूक खर्च नियमाप्रमाणे स्वतःकरण्यास तयार आहे तरी तहसीलदार यानी अर्जाच्या अनुषंगाने शासनाच्या धोरणानुसार लाभार्थ्यास वाळू उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भालगाव येथील लाभार्थ्यांनी केली आहे.घरकुल बांधकामासाठी वाळू मिळाली नाही तर दि 30/04/2025 रोजी लोकशाही मार्गाने तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणास बसण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी आपली व तहसील कार्यालयाची राहील असा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला.
या निवेदनावर गजानन पांडुरंग पुरी,विजय साबळे,भगवान खंडागळे,हरी मुळे,ऋषिकेश मुळे,नारायण भाकरे,ऋषी इंगळे,गणेश रामा जाधव,गणेश भगवान जाधव,सोमनाथ इंगळे,सोमनाथ लेंभे,दत्ता मुळे आदि घरकुल लाभार्थ्यांच्या सह्या आहेत.
Social Plugin