प्रतिनिधी --संजय भरदुक मंपिर
दिनांक 24 4 2025 रोजी सकाळी 11:45 मिनिटांनी मा.ठाणेदार ग्रामीण पोलीस स्टेशन कारंजा मा.श्री खंडारे साहेब व त्यांची सहकार्य टीम यांनी गायवळ येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ,अकोला आयडॉल शेतकरी शेतीनिष्ठ रविंद्र गायकवाड यांच्या नैसर्गिक शेती प्रकल्पला भेट देऊन यामध्ये गांडूळ खत निर्मिती व नींबू फळपीक उत्पादन याविषयी माहिती घेतली
तसेच पुढील काळात शेती करणाऱ्या पोलीस विभागातील सेवानिवृत्त शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करिता रवींद्र गायकवाड यांनी मार्गदर्शन करावे यासाठी सूचना दिल्या. मा. श्री खंडारे साहेब ठाणेदार ग्रामीण पोलीस स्टेशन कारंजा यांच्या सहकार्यातून लवकरच पोलीस विभागातील शेतीची आवड असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनात चालत असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख गांडूळ खत निर्मिती प्रकल्प व बायो इनपुट प्रशिक्षण केंद्रावर घेतले जाणार आहे.
Social Plugin