प्रतिनिधी--संजय भरदुक मंपिर
डॉ. पंजाबराव देशमुख गांडूळ खत निर्मिती प्रकल्प व बायो इनपुट प्रशिक्षण केंद्र ,गायवळ येथे अकोला जिल्ह्यातील कुंभारी या गावच्या शेतकऱ्यांचे गांडूळ खत निर्मिती अर्थशास्त्र विशेष प्रशिक्षण संपन्न झाले यावेळी गांडूळ खत निर्मिती व्यवसायिक दृष्ट्या करण्याच्या दृष्टिकोनातून प्रकल्प निर्मिती तंत्रशुद्ध प्रशिक्षण प्रकल्पाची शास्त्रशुद्ध उभारणी गांडूळ खताचा अर्थशास्त्र मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, पॅकिंग, ग्रीटिंग, आणि मार्केटिंग आधी विषयाचे मास्टर ट्रेनर PDKV आयडॉल शेतकरी शेतीनिष्ठ रवींद्र गायकवाड यांनी प्रशिक्षण घेतले.
या वेळी कुंभारी येथील फॉर्मर प्रोड्युसर कंपनीचे मुख्य व्यवस्थापक तथा चेअरमन सदानंद गावंडे बंधू व त्यांची सहकार्य टीम हे कुंभारी येते मोठ्या प्रमाणावर गांडूळ खत निर्मिती करण्याच्या हेतूने व फार्मर प्रोड्युसर कंपनीचा ब्रँड तयार करण्याच्या उद्देशाने डॉ. पंजाबराव देशमुख गांडूळ खत निर्मिती प्रकल्प व बायो इनपुट प्रशिक्षण केंद्र गायवळ येथे तांत्रिक माहिती व प्रशिक्षण घेण्यासाठी आले या वेळी मास्टर ट्रेनर रवींद्र गायकवाड यांनी प्रकल्प निर्मिती प्रकल्पासाठी लागणारे घटक यंत्रसामुग्री व कॉलिटी कंट्रोल ,वर्मी कंपोस्ट मॅन्युफॅक्चरिंग युनिट साठी लागणाऱ्या मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट तसेच लेआउट सिस्टम वर्मी वॉश कलेक्शन वर्मी कल्चर निगा व काळजी व विक्री व्यवस्थापन आदी विषयाचे शास्त्रशुद्ध भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या थेरीनुसार प्रशिक्षण दिले यावेळी प्रशिक्षार्थी यांना प्रक्षेत्र भेटीमध्ये रवींद्र गायकवाड यांनी रोज पैसे देणारी शेती संकल्पना डेली मनी ऑफ फार्मिंग रिसर्च संदर्भात माहिती दिली
या मध्ये देशी गोपालन, बायोगॅस निर्मिती तू गांडूळ खत मॅन्युफॅक्चरिंग व देशी कुक्कुटपालन खेकडा पालन मधुमक्षिका पालन फळबाग व्यवस्थापन पारंपारिक ऊर्जा स्त्रोत चा योग्य वापर आधी विषयाचे कृषीशास्त्र नुसार प्रशिक्षण देण्यात आले . प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी रवींद्र गायकवाड यांची टेक्निकल टीम यांनी सहाय्य केले असे असल्याचे प्रशिक्षण तथा उत्पादन प्रमुख सौ.भाग्यश्री गायकवाड यांनी कळविले.
Social Plugin