Ticker

6/recent/ticker-posts

भीम जन्मोत्सव आनंदात संपन्न



 बुध  दि [प्रकाश राजेघाटगे ] 

.डॉ .  बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान बुध यांच्या वतीने 134वा भीम जन्मोत्सव प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष  चंद्रकांत खराटे( आबा) यांच्या संकल्पनेतून  मोठ्या आनंदात उत्सवात संपन्न करण्यात आला .  दि ..13.रोजी रात्री 12.00 वाजता बुद्ध वंदना करून केक कटिंग सेलिब्रेशन, नृत्य, गीत गायन   व फटाक्यांची आतषबाजी करून प्रथम दिवसाचे पुष्प गुंफण्यात आले .धम्म उपासिका प्रणोती हिचा देखील वाढदिवस सर्वांच्या उपस्थितीत संपन्न करून   धम्मपालन आणि सरनत्तय  गाथा गाऊन समारोप करण्यात आला

 दि .14  रोजी सकाळी 8.00वाजता पंचशील ध्वजारोहण क रण्यात आले नव विवाहित उपासक धनराज उपासिका मेघा  यांच्या शुभ हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले  त्याचबरोबर सर्व महापुरुषांना मान्यवरांच्या शुभ हस्ते पुष्पहार घालून पूजन केले . सकाळी ठीक नऊ ते दहा या वेळेत ध्यानधारणा शिबिराचे आयोजन करण्यात आले प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष चंद्रकांत खराटे आबा यांनी या शिबिराविषयी मौलिक मार्गदर्शन केले बौद्धाचार्य सचिन खराटे सर यांनी त्रिशरण पंचशील भीमस्मरण भीम स्तुती बुद्ध वंदना मंगल मैत्री धम्मपालन गाथा गाऊन डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी परिचय करून देण्यात आला . सिद्धार्थ कॉलेजच्या प्रोफेसर सुलक्षणा बूधकर मॅडम यांनी हिंदू कोड बिल बाबासाहेबांचे शैक्षणिक योगदान, सामाजिक कार्य, राष्ट्रीय कार्य याविषयी मौलिक मार्गदर्शन केले. रयत शिक्षण संस्थेचे माजी मुख्याध्यापक अरविंद खराटे सर यांनी सर्व व्यापक डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा परिचय करून दिला .

 प्राध्यापिका कांचन मॅडम यांनी देखील स्त्री उद्धारक बाबासाहेब यांच्या कार्याविषयी त्यागा विषयी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत खराटे आबा यांनी देखील डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान  बुध आयोजित करत असणारे विविध सामाजिक उपक्रम याविषयी समाधान व्यक्त केले   प्रतिष्ठानच्या ध्येय धोरणाविषयी आपल्या मनोगतातून मौलिक संदेश दिला शिका संघटित व्हा संघर्ष करा बाबासाहेबांचा मंत्र आत्मसात करा आपल्या समस्या निश्चित प्रतिष्ठानच्या माध्यमातून दूर केल्या जातील , सामाजिक वनीकरण, युवक रोजगार मेळावा, अंधश्रद्धा निर्मूलन याविषयी मौलिक मार्गदर्शन केले महिला, लहान मुले यांनी संगीत खुर्ची, नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली चेतन खराटे यांनी उपस्थित यांना अल्पोपहार  मिष्ठअन्न खीर  देऊन जयंती उत्सवाचा समारोप करण्यात आला . याप्रसंगी  पुसेगाव पोलीस स्टेशनचे   चंद्रहार खाडे, पोलीस बांधव,  धम्म उपासिका उपासक  प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते  प्रतिष्ठानचे सल्लागार विनोद खराटे यांनी आभार मानले .