सिंदखेडराजा:- ज्ञानेश्वर तिकटे
सिंदखेडराजा :- 13 एप्रिल रोजी राहेरी बु येथे हनुमान जन्मोत्सव निमित्त ग्रामदैवत झेंड्याची देवीचं सोगांच उत्सव (ता. १३) पहाटे देवीच्या सोंगाची गावभर प्रदक्षिणा घालण्यात आली. त्यानंतर दुपारी कुस्त्यांचा आखाडा भरला .छत्रपती संभाजी नगर, हिंगोली, बुलढाणा ,जुमडा आसे आनेक गावातुन कुस्तीपटू मर्दानी कुस्ती साठी आखाड्यात उपस्थित होते
दरम्यान, आई भवानी की जय च्या जयघोषाने कुस्तीच्या दंगली ची सुरूवात झाली एका मागे एक कुस्ती ची लढत रंगत होती अतिषय चांगल्या प्रकारे कुस्तीपटू ऐकमेकांना चितपट करण्याच्या तयारीत होते
विशाल मानेने मारला कुस्तीचा विजयी डाव कुस्ती स्पर्धेत ७ हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस छत्रपती संभाजीनगर येथील पैलवान विशाल माने यांनी जिंकले.तर दुसरे ५ हजार रुपयांचे बक्षीस अर्पित जगदाळे यांनी पटकावले,आणि तिसरे बक्षीस वैभव जुमडे यांनी मिळविले. गावकरी व कमिटीच्या वतीने जमलेले सर्व प्रक्षेकांंचे व सगळ्या कुस्तीपटू चे आभार मानले
.jpg)




Social Plugin