गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
समाज प्रबोधन, संस्कृती संवर्धन आणि ऐक्याचा दिला संदेश गोर बंजारा समाजाला एकसंघ ओळख, भाषेला घटनात्मक दर्जा व 'वन नेशन वन रिझर्वेशन--डॉ. सुभाष राठोड यांचे प्रतिपादन
२०२५ तिर्थक्षेत्र भक्तिधाम पोहरागड येथे गोर बंजारा धर्मपीठ व राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय बंजारा साहित्य परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदी पुणे येथील प्रसिद्ध लेखक प्रा. डॉ. सुभाष राठोड होते. तर उद्घाटक म्हणून गोर बंजारा धर्मपीठ संकल्पनेचे जनक, प्रसिद्ध उद्योगपती, भगवंत सेवक किसनभाऊ राठोड हे होते.
समन्वयक म्हणून राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. विलासभाऊ राठोड यांनी जबाबदारी पार पाडली. संमेलनात विविध राज्यांतील व महाराष्ट्रातील विविध भागांतील साहित्यिक, कलाकार आणि गोर बंजारा समाजातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
संपूर्ण भारतातील गोरबंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यात्रा महोत्सव साजरा होत असतो. या महोत्सवाचे औचित्य साधून गोर बंजारा धर्मपीठ, भक्तीधाम, पोहरागड येथे धर्म ध्वजारोहण, गोर बंजारा धर्म परिषद, गोर बंजारा साहित्य परिषद, राजकीय परिषद व सांस्कृतिक स्नेहमेळावा यांचे आयोजन दरवर्षी नित्यनेमाने करण्यात येत असते.
गोर बंजारा समाजाच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रबोधनासाठी आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य परिषदेची सुरुवात पारंपरिक ग्रंथदिंडी व मिरवणुकीने उत्साहात झाली."संघर्षातून उगमलेली संस्कृती ही कधीच नष्ट होत नाही ती काळाच्या वाळवंटातही आपला रंग राखून ठेवते!"
भारतीय समाजव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक असलेला गोर बंजारा समाज आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक वारशामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतो. बदलत्या काळासोबत मार्गक्रमण करत असतानाही या समाजाने आपल्या प्राचीन चालीरीती, परंपरा आणि प्रथा जपल्या आहेत. संपूर्ण भारतभर विखुरलेला असला तरीही, गोर बंजारांनी आपली सांस्कृतिक ओळख आणि एकात्मता आजतागायत अबाधित ठेवली आहे. आजमितीला जवळपास २१ घटकराज्य, ३ केंद्रशासित प्रदेश व भारताबाहेरही गोर बंजारा समाजाचे वास्तव आहे. विविध प्रांतात बंजारा समाजाची विविध नावेही प्रचलित आहेत. नावांची विविधता हा एक ओळखीचा मोठा अडसर ठरत आहे. गोर बंजारा समाजाला वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या आरक्षण सूचींमध्ये विभागले गेले आहे. ही असमानता दूरसंमेलनाध्यक्ष डॉ. सुभाष राठोड यांचा सरकार करताना किसनभाऊ राठोड व इ.गोर प्रकाश राठोड लिखित गोरबोली पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
करून समाजाला अनुसूचित जमाती किंवा अनुसूचित जाती म्हणून एकसंधपणे समाविष्ट करणे गरजेचे आहे. यासाठी स्वतंत्र गोर बंजारा, जातिनिहाय जनगणना, सांस्कृतिक अभ्यास व धोरणात्मक सहकार्य आवश्यक आहे.गोर बंजारा समाजाचा इतिहास, संस्कृती, भाषा आणि संघर्ष हा के वळ त्यांच्या समाजापुरता मर्यादित नाही तो भारतीय समाजशास्त्राचा, लोकपरंपरेचा आणि मानवतेच्या लक्ष्याचा एक अभिन्न भाग आहे. आजची गरज आहे, 'न्याय, सन्मान आणि आत्मभान' या त्रिसूत्रीवर एकत्रित काम करण्याची !
गोर बंजारा समाजाने आपल्या स्वत्वाचा, अस्मितेचा व स्वाभिमानाचा झेंडा उम्र तेवावा, नवे नेतृत्व तयार करावे, युवकांनी शिक्षण, संशोधन, प्रशासन, राजकारण, साहित्य, कला, सामाजिक क्षेत्रात पुढे यावे. आजच्या ग्लोबलायझेशनच्या युगात भाषिक व सांस्कृतिक ओळख टिकवून ठेवणे हे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर साहित्यिक आणि सांस्कृतिक सशक्तीकरणाचा मार्ग म्हणजे स्वाभिमानाचा आत्मिक प्रवास ठरतो. असे प्रतिपादन धर्मनेता किसनभाऊ राठोड यांनी केले.. तसेच गोर बंजारा समाजाने पारंपरिक व्यवसाय, कष्टमय जीवनशैली आणि संघर्षांच्या वादळातून मार्ग काढत स्वतःची वाटचाल सुरु ठेवली आहे. भारतीय गोर बंजारा समाजाने आपल्या ऐतिहासिक वाटचालीकडे पाहत वर्तमानाचे चिंतन कराये, आणि भविष्यासाठी आत्मभान व आत्मविश्वासाच्या बळावर वाटचाल करावी, गोरबंजारा समाजाने आधुनिक शिक्षण, स्पर्धा परीक्षा, उद्य शिक्षण, राजकीय नेतृत्व, शासकीय सेवा, उद्योजकता आणि समाजकार्य या विविध क्षेत्रांमध्ये आपला उसा उमठवायला सुरुवात केली आहे. पण अजूनही समाजाचा मोठा वर्ग सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या वंचित आहे. त्यांच्या सक्षमीकरणासाठी सामाजिक संघटन, व्यापक जनजागृती, आणि धोरणात्मक उपाययोजनांची नितांत गरज आहे. असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉ सुभाष राठोड यांनी केले...
महाराष्ट्र शासनाने 'गोर बंजारा साहित्य अकादमी' स्थापन करून एक अभिनंदनीय पाऊल उचलले आहे. आता केंद्र शासनाने सुद्धा अखिल भारतीय 'गोर बंजारा कला आणि साहित्य अकादमी' स्थापन करावी, जेणेकरून या समाजाच्या संतपरंपरा, लोककथा, परंपरागत ज्ञान व सांस्कृतिक वारसा यांचे दस्तऐवजीकरण होईल. बंजारा समाजाची बोली 'गोर बोली' ही संपूर्ण भारतभर एकसारखी आहे. ही बोली म्हणजे सांस्कृतिक एकतेचे मूर्तिमंत उदाहरण आहे. ही भाषा भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूबीत समाविष्ट करून घटनात्मक मान्यता दिली पाहिजे, ही समाजाची दीर्घकालीन मागणी आहे.
या परिषदेमध्ये राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या स्मरणिकेचे तसेच प्रा. विलास राठोड यांच्यावरील गौरव ग्रंथाचे व गोर प्रकाश राठोड लिखित गोरबोली पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ही प्रकाशने समाजातील साहित्यिक समृद्धी आणि योगदानाची साक्ष आहेत.
संमेलनातील अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. सुभाष राठोड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संपूर्ण देश पातळीवरगोर बंजारा समाजाला एकाच नावाने ओळखले जावे, "वन नेशन, वन रिझव्हेंशन" या तत्त्वावर देशभरातील गोर बंजारा समाजाला एकाच आरक्षण सूचीत समाविष्ट करण्याची ठोस मागणी मांडली. गोर बंजारा भाषेला संविधानिक भाषेचा दर्जा देणे, यांसारख्या अनेक मुद्यांवर डॉ. सुभाष राठोड यांनी आपले मत मांडले. यावेळी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. विलासभाऊ राठोड, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. भिकन जाधव यांनी सामाजिक संघटन आणखी मजबूत करण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी गोर बंजारा समाजातील महिलांनी पारंपरिक बंजारा नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. महिलांचे आणि भजनकारांचे गोर बंजारा लोकसाहित्याच्या संवर्धनातील योगदान अधोरेखित करण्यात आले. राष्ट्रीय गोर बंजारा कला अकादमी स्थापन करण्याची गरजही जोरकसपणे मांडण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात समाजाने नवस-सायासासाठी कर्जबाजारी होऊ नये, यासाठी व्यापक प्रमाणावर सामाजिक प्रबोधन करण्यात यावे. त्याऐवजी मुलाबाळांना चांगले शिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवण्यावर भर द्यावा, गोर बंजारा संस्कृतीची जपणूक, नव्या पिढीकडून साहित्यनिर्मिती वाढवण्याची आवश्यकता संमेलन अध्यक्षांच्या भाषणातून अधोरेखित करण्यात आली. साहित्य परिषदेचे बांगल्याप्रकारे आयोजन केल्याबद्दल डॉ. राठोड यांनी धर्मनेता किसनराव राठोड, गोर बंजारा धर्मपीठ व राष्ट्रीय बंजारा परिषदेचे आभार व्यक्त केले.
या साहित्य परिषदेतील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम म्हणजे गोर बंजारा बोलीभाषेतील बहारदार कवी संमेलन. या संमेलनात प्रसिद्ध कवी सुरेश राठोड (काटोल), कवी डॉ. शांतीलाल चव्हाण (पातूर), कवी रतन आडे (हिंगोली), बाबूसिंग राठोड आदींनी आपल्या सशक्त कविता सादर केल्या. यावेळी विविध मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती लाभलीः
कार्यक्रमाचे सुयोग्य आणि प्रभावी सूत्रसंचालन प्रा. सुरेखा चव्हाण (अमरावती) आणि श्री. श्यामभाऊ राठोड (कारंजा) यांनी केले. आभारप्रदर्शन प्रा. संतोष राठोड यांनी करून उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.
या परिषदेमुळे गोर बंजारा समाजातील साहित्यिक एकता, संस्कृतीचे जतन आणि सामाजिक प्रश्नांवरील जागरूकता अधिक दृढ झाली आहे यावेळी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य विलास भाऊ राठोड श्याम भाऊ राठोड सुनील राठोड डॉक्टर गुणवंत राठोड नारायण चव्हाण रमेश पवार किसन आडे प्रकाश राठोड सर अनुभव चव्हाण सुशील राठोड गोपाल आडे वैभव चव्हाण आधी राष्ट्र बंजारा परिषदेचे पदाधिकारी अधिक या कार्यक्रमाला उपस्थित होते व सहकार्य लाभले.





Social Plugin