बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, जांब हायस्कूल जांब या शाळेचा एस.एस.सी. फेब्रुवारी/मार्च 2025 परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून प्रथम तीन क्रमांकाची मानकरी पुढील प्रमाणे स्वराली गणपत सुतार 96.20 % (खटाव केंद्रात प्रथम), सत्यम प्रशांत शिंदे 94.40 %(खटाव केंद्रात तृतीय) , शंभू सुखराज शिंदे 87.20 % एवढे गुण मिळवून यशाचे मानकरी ठरले आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सोय होण्याकरता संस्थेने जांब तालुका खटाव येथे या विद्यालयाची 1996 साली स्थापना केली.स्थापनेपासूनच येथील विद्यार्थी शालेय क्रीडा स्पर्धा, बाह्य परीक्षा, स्पर्धा परीक्षा, तसेच विविध क्षेत्रात नेहमीच चमकत असतात. डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या व सुंदर निसर्ग संपदा लाभलेल्या या गावातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गुणवत्तेबरोबर संस्कार जपणाऱ्या या शाळेत शिक्षणाबरोबर विविध उपक्रमांची राबवणूक करून विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देण्याचा अखंड प्रयत्न चालू असतो.
निकालाची ठळक वैशिष्ट्ये
विशेष प्राविण्य=7, प्रथम श्रेणी=5, द्वितीय श्रेणी=2 विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहेत या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ . सुरेश जाधव,उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, सचिव मोहनराव जाधव,खजिनदार लक्ष्मणराव जाधव,सर्व संस्था विश्वस्त व पदाधिकारी तसेच गुणवत्ता वाढ प्रकल्प अधिकारी जयंतराव जाधव, एस. आर.पाटील,श्री के.डी. पवार सर,श्री डी.पी. शिंदे सर, मुख्याध्यापक जी.पी.कुचेकर तसेच सर्व शिक्षक सहकारी,पालक व ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले .





Social Plugin