मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
भारत हा कृषिप्रधान देश असून शेती ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे.तरीही बदलत्या हवामान,पाण्याच्या टंचाई आणि पारंपरिक शेती पद्धतींमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने "नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 पोकरा योजना सुरू केला आहे. ज्याचा उद्देश शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडे वळविणे आणि त्यांना हवामान बदलामुळे उत्पन्नावर होणाऱ्या प्रतिकूल परिणामांपासून वाचविणे आहे.या प्रकल्पअंतर्गत अनेक उद्दिष्टे आहेत.जसे की हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब, शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादन वाढवण्यास मदत करणे,पाणी व्यवस्थापन,सेंद्रिय कर्ब वाढविणे,उत्पादन खर्च कमी करणे, संसाधनांचा कार्यक्षमतेने वापर करणे,कृषि आधारित व्यवसायांना चालना,महिला शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देणे व कृषि हवामान सल्ला ही आहेत.म्हणून ज्या गावाची ह्या प्रकल्पासाठी निवड झालेली आहे.
त्या गांवामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेऊन जनजागृती केली जात आहे.आणि याचाच एक भाग म्हणून मौजे ग्राम कोळदरा येथे गावस्तरीय समितीची सभा घेण्यात आली.त्याकरिता कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ रेश्मा हांडे होत्या. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री एम डी कांबळे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेबद्दल उपस्थीत गावकऱ्याना इत्यंभूत माहिती दिली.या कार्यक्रमाला डी के रणवीर कृषी सहाय्यक यांच्यासह गावातील शीलाबाई करवते,निर्मला कदम,रेखा मैघाने,ज्योती धदरे,मिरा धदरे,संतोष देवकर,सुरेश जावळे,मारोती ढोके,विश्वनाथ हांडे,जगदीश करवते,सुदर्शन धदरे,योगेश करवते,वासुदेव देवकर,महादेव लोखंडे,ज्ञानदेव धदरे,दिनकर पांडे,बबन डाखोरे,योगेश घुगे, अजिंक्य मेडशीकर सह गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Social Plugin