100% निकालाची परंपरा कायम
बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री हनुमानगिरी हायस्कूल पुसेगाव या शाळेचा एस.एस.सी. मार्च 2025 परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून प्रथम तीन क्रमांकाची मानकरी पुढील प्रमाणे
गौरी ज्ञानेश्वर चव्हाण 97.40 %, रोशनी नौशाद मुल्ला 94.80 %, स्वरूपा आनंद तारळकर 94.60 %एवढे गुण मिळवून यशाचे मानकरी ठरले आहेत. गुणवत्तेबरोबर संस्कार जपणाऱ्या या शाळेत शिक्षणाबरोबर विविध उपक्रमांची राबवणूक करून विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देण्याचा अखंड प्रयत्न चालू असतो.
निकालाची ठळक वैशिष्ट्ये 80 टक्के पेक्षा अधिक 37 विद्यार्थी ,तर 90% पेक्षा अधिक गुण 12 विद्यार्थ्यांना प्राप्त झाले आहेत .या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश जाधव,उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव, सचिव श्री मोहनराव जाधव,खजिनदार श्री लक्ष्मणराव जाधव,सर्व संस्था विश्वस्त व पदाधिकारी तसेच गुणवत्ता वाढ प्रकल्प अधिकारी श्री जयंतराव जाधव,श्री एस. आर.पाटील,श्री के.डी. पवार सर,श्री डी.पी. शिंदे सर, प्राचार्य डी. एन. गोफणे ,पर्यवेक्षक आर. एन. जाधव ,किमान कौशल्य विभाग प्रमुख प्राध्यापक जे. बी. जाधव तसेच सर्व सहकारी,पालक व ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले .
Social Plugin