Ticker

6/recent/ticker-posts

सफाळे येथे सफाळे कृती समिती तर्फे आमरण उपोषण



पालघर (ज्ञानेश चौधरी)१३मे ग्रामीण प्रतिनिधी

सफाळे येथे सफाळे कृती समिती तर्फे रेल्वे प्रश्नाबाबत दिनांक १३मे पासून आमरण उपोषण चालू केले आहे. रेल्वे ने एप्रिल महिन्यात सफाळे पूर्व आणि पश्चिम दिशेला जोडणारे रेल्वे फाटक कायम स्वरुपी बंद केले.  वाहने जाण्यासाठी नवीन ओव्हरब्रिज बांधला गेला परंतु पादचारी मार्ग बनवला गेला नाही फक्त एकमेव फूटओवर ब्रीज असल्या कारणे प्रवासी वर्गाना ट्रेन पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. रेल्वे प्रवासी आणि स्थानिक लोकांना येण्याजण्यासाठी कुठलेही प्रयोजन केले गेले नाही फाटका लगत रेल्वे ने फूट ओव्हरब्रिज चे काम चालू केले होते ते सुद्धा बंद करण्यात आले. सदर प्रश्नावर योग्य तो मार्ग काढण्याच्या मागणी साठी आमरण उपोषण करण्यात येत आहे.  लवकरात लवकर रेल्वे प्रशासन काही मार्ग काढेल ह्या कडे सामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.