प्रतिनिधी @ समाधान भुतेकर
स्थानिक सहकार विद्या मंदिर दे. माही शाळेचा मागिल 8 वर्षाची 100% निकालची परंपरा कायम ठेवत यावर्षी सुद्धा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत कायम ठेवली यामध्ये गायत्री पऱ्हाड या विद्यार्थिनीने 97.60 %गुण घेऊन प्रथम क्रमांक प्राप्त केला तर स्नेहा गवई व जीवन जायभाये या दोघांनी 92.60% घेऊन द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर तिसरा नंबर अस्मिता आघाव हिने 92.40%घेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली असून सदर शाळेतील 70 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले असता 12 विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले तर 38 विद्यार्थी 80 टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले. सदर निकालाचे श्रेय विद्यार्थ्यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राधेश्यामजी चांडक बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर सुकेशजी झंवर माननीय सौ कोमल झंवर अध्यक्ष बुलढाणा अर्बन तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांना दिले
Social Plugin