मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव दि.21 मे जिल्ह्यात जलसंवर्धनासाठी सुरू असलेल्या ‘जलतारा’ अभियानात उल्लेखनीय प्रगती करणाऱ्या गावांसाठी एक विशेष सन्मान दिला जाणार आहे. 500 किंवा त्याहून अधिक जलतारे पूर्ण करणाऱ्या सन्माननीय सरपंच , उपसरपंच, तलाठी , ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलिस पाटील,ग्राम रोजगार सेवक,वॉटर हिरो यांना जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्यासमवेत त्यांच्या निवासस्थानी ‘Coffee with Collector’ या विशेष कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.
हा कार्यक्रम 26 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. यात सहभागी होण्यासाठी दिनांक 24 मे 2025 पर्यंत 500 जलतारे पूर्ण करून त्यांचे Geo-tagging करणे अनिवार्य आहे. ही संधी जलतारा कार्यात पुढाकार घेतलेल्या ग्रामपातळीवरील अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. जिल्ह्यातील जलसंपत्तीची प्रभावी व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम एक प्रेरणादायी पाऊल ठरणार आहे.





Social Plugin