Ticker

6/recent/ticker-posts

घरकुल घोटाळा उघड चार कंत्राटी कार्य मुक्त !



*आता फक्त कारवाईची वाट,शासनाची दिशाभूल करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार का*

मालेगाव प्रतिनिधी / जावेद धन्नू भवानीवाले

मालेगाव : - मालेगाव पंचायत समितीतील घरकुल योजनेतील भ्रष्टाचार व सावळा गोंधळाची गंभीर दखल अखेर मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली असून,मालेगाव पंचायत समितीमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे चौकशी अहवाल सादर करून विविध तक्रारींची सखोल पाहणी केल्यानंतर एकूण चार कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवा मुक्त करण्यात आले आहे.ग्रामीण गृहनिर्माण विभागातील कंत्राटी अभियंता दोषी ठरवत पदावरून हटवण्यात आले आहे.घरकुल वाटपात आर्थिक व्यवहार,अपात्रांना लाभ,खोट्या अहवालांद्वारे मंजुरी,तसेच विधवा नसलेल्या महिलांना विधवा दाखवून लाभ दिल्याचे प्रकार उघडकीस आले होते.मात्र,आता सर्वसामान्यांचा एकच सवाल आहे दिशाभूल करणाऱ्यांवर वसुली होणार का?

            फौजदारी गुन्हा दाखल होणार का?आणि संबंधितांना शिक्षा होणार का?

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांकडून आर्थिक व्यवहार करून मंजुरी देणे,खोट्या कागदपत्रांच्या आधारे मंजुरी मिळवणे,विधवा नसलेल्या महिलांना ‘विधवा’ दर्शवून घरकुल मंजूर करणे,चुकीचे बांधलेले घरे दाखवून शासनाची दिशाभूल करणे अशा बऱ्याच प्रकारच्या लेखी तक्रारी मालेगाव पंचायत समिती व वाशिम जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे आल्या होत्या तसेच अशी गंभीर प्रकारे शासनाची फसवणूक झाल्याचे आता चौकशीत स्पष्ट होत आहे.चौकशी अहवाल सादर झाल्यावर काही कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली असली,तरी ज्यांनी या भ्रष्ट प्रक्रियेला दिशा दिली,अशा मुख्य सूत्रधारांवर गुन्हा दाखल होणार का? वसुली केली जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.सध्या घरकुल विभागातील कामकाज थांबले असून,घरकुलापासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांचे नुकसान कोणी भरून काढणार? याचा विचार होणे गरजेचे आहे.एकीकडे लाभार्थ्यांवर कागदपत्रांची परिपूर्णता मागितली जाते,तर दुसरीकडे धनदांडग्यांना सत्ताधाऱ्यांच्या छत्रछायेतून घरे मंजूर केली जातात,ही बाब सामान्य जनतेच्या मनात असंतोष निर्माण करणारी ठरली आहे. या निर्णयामुळे वंचित लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून,दोषींवर अधिक कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जिल्हा स्तरावरून होत आहे. काही अपात्र लाभार्थ्यांची यादी देखील लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे.


दोषी कंत्राटी अभियंता व कर्मचारी सेवा मुक्त

घरकुल विभागातील कामकाज ठप्प

शासनाची दिशाभूल करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार का?

पात्र लाभार्थ्यांना न्याय कधी मिळणार?

फसवणूक झालेल्या निधीची वसुली कोण करणार?

जिल्ह्यात या घरकुल घोटाळ्याची चर्चा चांगलीच तापली असून,आता या भ्रष्ट यंत्रणेला मोकळे सोडायचे की दोषींवर खटला दाखल करून शासनाचा सन्मान राखायचा हे निर्णय प्रशासनाने घ्यायचे आहेत.


सध्या मालेगाव पंचायत समिती घरकुल विभागामध्ये घरकुल विभागाचे संपूर्ण कामकाज ठप्प झाले असून,या विभागात नवीन जबाबदार व्यक्तीची नेमणूक होईपर्यंत पाच ते सहा दिवस कोणतेही काम होणार नाही,