Ticker

6/recent/ticker-posts

समाजहितासाठी कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करणार – राम देवसरकर



स्व.डॉ. आत्मारामजी गावंडे स्मृती पित्यर्थ पुरस्काराची घोषणा 

बाळासाहेब पवार प्रतिनिधी उमरखेड

समाजात राहून समाजातील विविध पैलुंचा अभ्यास करून समाजातील समस्या व चांगल्या बाबी या समोर आणण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान कुठेतरी व्हावा म्हणून पुढल्या वर्षीपासून विदर्भ पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांसाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून स्व . डॉ . आत्मारामजी गावंडे यांच्या स्मृतीपित्यर्थ उत्कृष्ट पत्रकारांना मानचिन्ह व रोख पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची घोषणा यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर यांनी केली. स्थानीक गो.सी . गावंडे महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बीए जनसंज्ञापन व वृत्तपत्र विद्या पदवी शिक्षणक्रम द्वारा आयोजित पत्रकार सन्मान सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.

सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्हा अखील कुणबी समाज संस्थेचे सचिव डॉ. या . मा . राऊत, विभागीय संचालक अमरावतीचे प्रा . डॉ . सुभाष सोनुने, उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ, नाशिकचे शिक्षण शास्त्र विद्याचे प्रमुख प्रा. डॉ . दयाराम पवार, प्राचार्य एम . बी . कदम हे विचारपीठावर उपस्थित होते. राम देवसरकर यावेळी म्हणाले की, मागील पंधरा वर्षापासून महाविद्यालयामध्ये स्थानिक दैनिक पत्रकार , साप्ताहिक संपादक, इलेक्ट्रानिक्स प्रतिनिधी, युट्युब चॅनल प्रतिनिधी यांचा सन्मान हा करण्यात येत असून पुढील वर्षीपासून यवतमाळ जिल्ह्यातील व विदर्भ पातळीवर पत्रकार जे समाजासाठी आपला जीव मुठीत घेऊन समाजहित जोपासण्यासाठी धडपड करणाऱ्या पत्रकारांचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे. यासाठी स्व . डॉ . आत्मारामजी गावंडे (अमेरिका ) यांच्या स्मृतिपित्यर्थ रोख पुरस्कार देवुन सन्मान करणार असल्याचे सांगितले . यावेळी तालुक्यातील जवळपास ५० च्यावर विविध पत्रकारांचा संविधान देवुन गौरव करण्यात आला . प्रास्ताविक व संचलन प्रा. बि. यु . लाभशेटवार यांनी तर आभार प्रा.लक्ष्मीकांत नंदनवार यांनी मानले .