बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
खटाव तालुक्यातील राजापूर येथील सातपुता वस्तीवरील ओढयावर पुल नसल्यामुळे मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर आल्यामुळे आठ दिवसापासुन रहदारीचा रस्ता बंद असल्यामुळे शेतकरी , ग्रामस्थांचे हाल होत आहेत . तरी ताबडतोप पुलाचे काम व्हावे , अशी मागणी अजित दिडके व ग्रामस्थांनी केली आहे . स्वातंत्र्य काळापासून ते आतापर्यंत राजापूरगावची मुख्य वस्ती असलेले तसेंच डोंगराच्या पायथ्याशी व दुर्गम भागात वसलेले राजापूर सातपुता वस्ती येथे जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू असून, या परिसरात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. या परिसरातील ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. तसेच सातपुते वस्तीचा मुख्य तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे त्यामुळे या ओढ्या- नाल्यांना आलेल्या पुरामुळे तसेंच कोणताही पर्यायी पूल उपलब्ध नसल्याने अक्षरशः सर्व सातपुतावर ग्रामस्थ ओढ्याच्या पलीकडे अडकून पडले आहेत. पावसामुळे जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले असून नागरिकांची नियमित कामेही प्रभावित झालीत.एखादी चुकून जीवघेणी घटना घडली तर नक्की करायचे काय हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे..
तरी प्रशासनाने आमच्या समस्यांचा गंभीरपणे विचार करून जमेल तेवढ्या लवकरात लवकर उपयोजना करावी अन्यथा येणाऱ्या मान्सून काळात पाऊस उघडला नाही तर परिस्थिती अजून भीषण होऊ शकते
यासाठी सातपुता कर ग्रामस्थ वेळोवेळी शासनाचा पाठपुरावा घेत आहेत तरी लवकरच संभाव्य पुलाचे काम चालू होऊन त्यांची दैनंदिन कामे सुरु होतील अशी त्यांना एकमेव आशा आहे . काल दुपारी प्रांताधिकारी उज्वला गाडेकर , तहसिलदार बाई माने , तलाठी पाटील यांनी या भागाची पाहणी केली . यावेळी माजी सरपंच राजेंद्र पाटील , अजित दिडके व सातपुता वस्तीवरील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते . यावेळी प्रांताधिकारी उज्वला गाडेकर , तहसिलदार बाई माने यांनी पाऊस ओसरल्यानंतर ओढ्याचे पाणी कमी झाल्यावर लवकरात लवकर नविन पुलाचे काम चालू होईल , असे आश्वासन ग्रामस्थांना दिले .
.jpg)




Social Plugin