राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
जगाला करूणा व शांतीचा संदेश देणारे महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिग्रस येथे कॅण्डल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा येथे अभिवादन व त्रिशरण पंचशील घेऊन रॅली ला सुरुवात करण्यात आली. वैशाख पौर्णिमेला च बुद्ध पौर्णिमा म्हणतात. याच पौर्णिमेला त्रिविध पौर्णिमा सुद्धा म्हणतात. विश्वातील बौद्ध धर्मात पौर्णिमेला अनन्य साधारण महत्त्वाचे स्थान आहे. या पौर्णिमेला तथागत भगवान गौतम बुद्धाच्या जीवनात पाच महत्त्वपूर्ण घटना घडल्या. लुंबिनी मध्ये सिद्धार्थ चा जन्म, युवराजनी यशोधरेचा जन्म, राजकुमार सिद्धार्थ चा विवाह, बुद्धगया येथे ज्ञान प्राप्ती, कुशीनगर येथे तथागत भगवान बुद्धाचे महापरिनिर्वाण या सर्व घटना हया वैशाख पौर्णिमेलाच घडल्या. त्यामुळेच या पौर्णिमेला वैशाख पौर्णिमा अर्थात बुद्ध पौर्णिमा म्हणतात
सदर रॅलीमध्ये भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दिग्रस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन मंडळ दिग्रस, व दिग्रस मधील सर्व बौद्ध उपासक,उपासिका,बाल, बालिका मोठ्या संख्येने उत्साहाने उपस्थित होते.
Social Plugin